नांदगाव हायवे लगत असलेला बंगला भर दिवसा फोडला ; काही रक्कम व दोन मोबाईल लंपास

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 18 July 2026 | 👁 214 Views
नांदगाव हायवे लगत असलेला बंगला भर दिवसा फोडला ; काही रक्कम व दोन मोबाईल लंपास
भर दिवसा हायवे लगत चोरी झाल्याने नांदगाव येथे खळबळ.
मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा सर्व्हिस रोड लगत असलेला बंगला आज दुपारी ३ ते ५ या वेळेत नांदगाव हायवे लगत असलेला बंगला भर दिवसा फोडला असून काही रक्कम व दोन मोबाईल लंपास केले आहे. एक मोबाईल १,५०,००० /- हजार तर एक मोबाईल २० हजार व स्मार्ट वॉच किंमत १५००० हजार रुपये अशी वस्तू लंपास केले असून या भर दिवसा हायवे लगत चोरी झाल्याने नांदगाव येथे खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिकृत असे की नांदगाव ओटव फाटा सर्व्हिस रोड लगत दिनेश शशिकांत कोरगावकर यांचा बंगला आहे कोरगावकर हे काही दिवसापूर्वीच मुंबईवरून गावी आले होते सध्या पावसाळा असल्याने ते सर्व सावडाव या धबधब्या ठिकाणी आज दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास नांदगाव येथून गेले धबधब्याचा आनंद लुटून घरी येतात पाहिले असता तर बंगल्याच्या दाराची कडी तोडून दरवाजा उघडलेला होता आणि आत मध्ये सामान सर्व कपाट विस्कटलेले पाहायला मिळाले त्यांनी सर्व साहित्य खातरजमा केली असता काही दोन ते तीन हजाराची रोग रक्कम आणि दोन मोबाईल सदर चोरांनी लंपास केल्याचे या कोरगावकरांच्या लक्षात आले त्यांनी सदर माहिती कणकवली पोलीस ठाणे येथे दुरध्वनी द्वारे दिली आहे. याबाबत तपास सुरू आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा |