अण्णासाहेब कल्याणी विद्यालय साताराची विद्यार्थिनी मनस्वी विनोद कांबळे हिने आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी 272 गुण मिळवून जिल्ह्यात(शहरी विभाग)३५ वे स्थान पटकावले.तसेच सातारा तालुक्यातून गुणवत्ता यादीत १४ वा क्रमांक मिळवला. तिने रयत शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या रयत टॅलेंट सर्च परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत 24 वे स्थान पटकावून शिष्यवृत्ती प्राप्त केली होती. शिवाय हस्ताक्षर स्पर्धा, निबंध,नाट्य स्पर्धांमधून आपल्या कौशल्याची चमक दाखवलेली आहे.
या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभागाचे सहसचिव बी एन पवार , उप मुख्याध्यापक प्रशांत पाटील,पर्यवेक्षक सौ.शशिकला घोरपडे, उपेंद्र घाडगे,गुरुकुल प्रमुख सचिन जाधव, विभागप्रमुख माधुरी जाधव, मार्गदर्शक शिक्षक व कुटुंबीय यांनी अभिनंदन केले.