सिद्धार्थनगर स्मशानभूमीतील सुविधा तातडीने द्या ; अन्यथा १५ ऑगस्टला आंदोलन

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 17 July 2026 | 👁 201 Views
सिद्धार्थनगर स्मशानभूमीतील सुविधा तातडीने द्या ; अन्यथा १५ ऑगस्टला आंदोलन
माजी नगरसेवक गौतम खुडकर यांचा इशारा
कणकवली : शहरातील वॉर्ड क्रमांक ८ मधील सिद्धार्थनगर स्मशानभूमीतील अपुऱ्या मूलभूत सुविधांबाबत माजी नगरसेवक गौतम खुडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नगरपंचायत प्रशासनाला इशारा दिला आहे. स्मशानभूमीतील लाकडाची व्यवस्था, वीजपुरवठा आणि संरक्षण भिंतीचे काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी कणकवली नगरपंचायत कार्यालयासमोर एकदिवसीय लक्षवेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सिद्धार्थनगर स्मशानभूमी अद्ययावत व्हावी यासाठी अनेक वर्षे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर या ठिकाणी बौद्ध समाजातील बांधवांच्या अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या. अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकडाच्या साठवणुकीसाठी गोडाऊन शेडही मंजूर होऊन त्याचे बांधकाम पूर्ण होऊन सुमारे चार महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप त्या ठिकाणी लाकडाची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे खुडकर यांनी म्हटले आहे.

गेल्या तीन ते चार महिन्यांत पाच ते सहा अंत्यसंस्कार या स्मशानभूमीत झाले असून प्रत्येक वेळी सार्वजनिक स्मशानभूमीतून लाकूड आणावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक खर्चाचा अतिरिक्त आर्थिक भार गोरगरीब कुटुंबांवर पडत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे.

याशिवाय, स्मशानभूमीत अनेक महिन्यांपासून वीजपुरवठा नसल्याने रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करणे कठीण होत आहे. तसेच स्मशानभूमीच्या बाजूने नदी वाहत असल्याने शेडला भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता असून त्या ठिकाणी संरक्षण भिंत उभारणेही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

स्मशानभूमीतील या सर्व समस्या तातडीने सोडवून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करत १५ ऑगस्टपूर्वी प्रशासनाने कार्यवाही न केल्यास नगरपंचायत कार्यालयासमोर एकदिवसीय लक्षवेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक गौतम खुडकर यांनी दिला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा |