दि.१७ जुलै रोजी जिंतूर आगारास परभणी विभाग नियंत्रक संदीप पडवळ यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी देत चालक,वाहक व यांत्रिक कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.वाहतूक अधिकारी सोळुंके यांनी असे सांगितले की चालकांनी आपले वाहन शांतपणे मार्गस्थ करावे,आपल्या कडून अपघाताचे प्रमाण होऊ नये या साठी योग्य काळजी घेऊन काळजीपूर्वक वाहन चालवावे व नियमांचे काटेकोर पालन करून अपघाताचे प्रमाण होणारच नाही अशी काळजी प्रत्येक एसटी चालकांनी घ्यावे असे आव्हान केले..प्रत्येक चालकांनी व वाहकानी आपला गणवेश परिधान करावा.प्रवाशी वर्गासोबत वाहकांनी सामंजस्याने वागावे उगाच वाद घालून वेळ वाया घालू नये असा सल्ला दिला.तसेच मुख्यकारागीर व यांत्रिक कर्मचाऱ्यांनी चालकांसी सुसंवाद साधून सुरू असलेल्या पावसाळ्यात गाड्यांची व्यवस्थित कामे वेळेवर करून द्यावी असे आव्हान केले.
सुरक्षा दक्षता अधिकारी काळबांडे यांनीही चालकांनी आपल्या कर्त्यव्यावर असताना मद्यपान करू नये.सुरक्षा दक्षता पथका कडून या बाबत वेळोवेळी तपासण्या सुरू राहतील असे सांगुन प्रत्येक चालकांनी आपल्या वाहनात अग्निशमन यंत्र सुस्थितीत आहे किंवा नाही ही पाहणी करावी असे सांगून विविध मुद्दे विशद करून मोलाचे मार्गदर्शन काळबांडे यांनी केले.
आज भेटी दरम्यान पाहणी पथकात सुरक्षा दक्षता अधिकारी काळबांडे,विभागीय वाहतूक अधिकारी एस.पी.सोळुंके, लेखाधिकारी महेश थोरवे,आदींचा समावेश होता.या वेळी जिंतूर आगार वाहतूक निरीक्षक प्रमोद निर्मले,आगार लेखाकार ज्ञानेश्वर पांचाळ, मुख्य कारागीर सुनील पंडित,वाहन परीक्षक देवकर,लिपिक गजानना गीते,गजानन घुगे,गुणीरत्न वाकोडे चालक वाहक व यांत्रिक कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.