बसवराज पाटील म्हणाले की, स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता असल्याची भावना अनेक नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे शासन व वीज वितरण कंपनीने नागरिकांच्या शंका दूर करून पूर्ण माहिती द्यावी. ग्राहकांची स्पष्ट संमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची घाई करू नये.
राज्यभर स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असताना ग्राहकांच्या संमतीशिवाय कोणत्याही घरावर किंवा आस्थापनावर स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नयेत, अशी ठाम भूमिका जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी मांडली आहे.
याबाबत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमार्फत गावोगावी बैठका, पत्रकांचे वाटप आणि नागरिकांशी संवाद साधून जागृती केली जाणार आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारी व सूचना संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले."जनतेच्या हिताला बाधा येणार असेल तर जनसुराज्य शक्ती पक्ष रस्त्यावर उतरून लोकांच्या हक्कासाठी लढा देईल," असा इशाराही बसवराज पाटील यांनी दिला.