सतीश मडके यांची 'रयत शिक्षण संस्थेच्या' मध्य विभाग विभागीय समन्वय समिती सदस्यपदी निवड!

👤 आकाश दडस सातारा | 📅 09 June 2026 | 👁 204 Views
सतीश मडके यांची 'रयत शिक्षण संस्थेच्या' मध्य विभाग विभागीय समन्वय समिती सदस्यपदी निवड!
"रयत शिक्षण संस्थेसारख्या आदरणीय आणि ऐतिहासिक संस्थेने माझ्यावर दाखवलेला हा विश्वास अत्यंत मोलाचा आहे. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि संस्थेच्या शैक्षणिक चळवळीला अधिक बळकटी देण्यासाठी मी कटिबद्ध राहीन." — सतीश मडके
सामाजिक कार्यकर्ते मा. सतीश वसंत मडके (रा. वाघमोडेवाडी, पो. गोंदवले, ता. माण, जि. सातारा) यांची रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित 'मध्य विभाग, सातारा विभागीय समन्वय समिती'च्या सदस्यपदी अत्यंत प्रतिष्ठेची निवड करण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची बैठक नुकतीच २५ मे २०२६ रोजी संपन्न झाली. या बैठकीतील ठराव क्रमांक ८ अन्वये सतीश मडके यांची या समन्वय समितीवर नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेचे सचिव श्री. विकास देशमुख यांनी अधिकृत पत्राद्वारे मडके यांना या निवडीचे पत्र प्रदान केले असून, संस्थेच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. मा. सतीश मडके हे गेल्या अनेक वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात हिररीने सहभागी होत आले आहेत. त्यांच्या याच अविरत कार्याची आणि वेळोवेळी मिळालेल्या सहकार्याची दखल घेऊन संस्थेने त्यांच्यावर ही नवीन व महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. विभागीय समन्वय समितीचे सदस्य या नात्याने आगामी काळात संस्थेच्या कार्यात त्यांचा सहभाग अधिक व्यापक आणि सक्रिय राहील, अशी आशा संस्थेने पत्राद्वारे व्यक्त केली आहे.



Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |