पित्याच्या खूनप्रकरणी मुलाला पाच दिवसांची पोलिस कोठडी

👤 सतिशकुमार पडोळकर जत | 📅 30 May 2026 | 👁 272 Views
पित्याच्या खूनप्रकरणी मुलाला पाच दिवसांची पोलिस कोठडी
जत तालुक्यातील लकडेवाडी येथे कौटुंबिक वादातून घडलेल्या धक्कादायक घटनेत वडिलांचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुलाला जत न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लकडेवाडी येथे गुरुवारी सायंकाळी संशयित पृथ्वीराज खंडू भिसे (वय २२) याचा त्याचे वडील खंडू श्रीमंत भिसे (वय ४५) यांच्याशी काही कारणावरून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात पृथ्वीराजने वडिलांवर हल्ला केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात खंडू भिसे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले; मात्र दुखापत गंभीर असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयासमोर हजर केले. सुनावणीदरम्यान तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे नमूद करत पोलिसांनी कोठडीची मागणी केली. त्यानुसार जत न्यायालयाने आरोपीला मंगळवारपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, घटनेमागील नेमके कारण, वादाची पार्श्वभूमी आणि अन्य बाबींचा शोध पोलिस घेत आहेत. ही घटना कौटुंबिक वाद किती गंभीर वळण घेऊ शकतो याचे विदारक उदाहरण ठरत असून, संपूर्ण जत तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
अवघ्या तीन महिन्यांत २० बेपत्ता, अपहृत मुली, महिला व पुरुषांचा लावला यशस्वी शोध | रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला | चांदवडमध्ये भरदिवसा सुरेश खैरे यांची हत्या; घटनेने शहरात खळबळ, मृतदेह शासकीय रुग्णालयात | जळगावात लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांवर गुन्हे दाखल | जळगावात खून, दुचाकीचा किरकोळ वादातून तरुणाची हत्या, एक जखमी | मानापूर येथे श्रीराम सेनेतर्फे रावण वध; सूर्पणखेचाही वध | गुंडेवाडीतील खूनप्रकरणी सांगली एलसीबीची धडाकेबाज कामगिरी; मुख्य संशयितासह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात | ईश्वरपुरात रेकॉर्डवरील आरोपी पिस्तुलासह जेरबंद : सांगली एलसीबीची कारवाई. ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त; विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल. |