दत्तात्रय दगडू राऊत यांचे दुःखद निधन

👤 रघुनाथ देवकर माळशिरस | 📅 28 May 2026 | 👁 225 Views
दत्तात्रय दगडू राऊत यांचे दुःखद निधन
पंढरपूर तालुक्यातील सुपली (पळशी) येथील नाभिक समाजातील दत्तात्रेय दगडू राऊत यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७४ व्यावर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच ग्रामस्थ, पाहुणेरावळे, नातेवाईक आप्तस्वकीय यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शनासाठी बहू गर्दी केली. दत्तात्रेय राऊत यांचा प्रेमळ स्वभाव व आपल्या प्रेमळ स्वभावातून सर्व नातेवाईकांना ग्रामस्थांना त्यांनी आपलेसं करून नेहमी हसत खेळत आपले जीवन जगले यांच्या या मायाळू स्वभावाबद्दल उपस्थित असलेल्या सर्वांनी आठवणींना उजाळा दिला आणि अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या अंत्ययात्रेस सर्व समाज घटकातील व्यक्ती उपस्थित होत्या. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित तीन मुले, एक मुलगी, भाऊ ,भावजया, पुतणे नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते धाराशिव शुगर फॅक्टरीतील सोपान राऊत यांचे थोरले बंधू होत. त्यांच्या जाण्याने सुपली गावात मोठी शोक कळा पसरली होती.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |