छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानासाठी रायगड जिल्ह्याची जबाबदारी आ. प्रमोद जठार यांच्याकडे

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 20 May 2026 | 👁 131 Views
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानासाठी रायगड जिल्ह्याची जबाबदारी आ. प्रमोद जठार यांच्याकडे
विधानपरिषदचे आ. प्रमोद जठार यांची राज्य शासनाच्या राज्यस्तरीय समितीत सदस्य म्हणून नियुक्ती ; शासन निर्णय जारी

कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान अधिक प्रभावी, लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय समितीची पुनर्रचना केली आहे. या समितीमध्ये विधान परिषद सदस्य आ. प्रमोद जठार यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे रायगड जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने १८ मे २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. या समितीच्या माध्यमातून राज्यातील महसूल समाधान शिबिरांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, शिबिरांच्या यशस्वीतेचा आढावा घेणे, प्रत्यक्ष पाहणी दौरे करणे तसेच स्थानिक प्रशासन व अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन आवश्यक निर्णय घेणे अशी जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे.

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान अधिक परिणामकारक करण्यासाठी विविध जिल्ह्यांसाठी समिती सदस्यांची नियुक्ती केली असून आमदार प्रमोद जठार यांच्याकडे रायगड जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे महसूल विषयक नागरिकांच्या तक्रारी व प्रश्न अधिक वेगाने निकाली निघण्यास मदत होणार आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |