करूळ गावावर शोककळा.... धरणात तीन मुलींचा बुडून मृत्यू...

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 13 May 2026 | 👁 237 Views
करूळ गावावर शोककळा.... धरणात तीन मुलींचा बुडून मृत्यू...
करुळ जामदारवाडी धरणात तीन मुलीचा
बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या तीनही शाळकरी मुली असून दोघी करूळ भोयडेवाडी येथील तर एक कुसूर येथील आहे. मामाच्या गावी आली होती ही घटना बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

करुळ जामदारवाडी येथील धरणात अंघोळीसाठी गेलेल्या तन्वी अनंत माळकर (16) करुळ, स्वरा संदीप सुर्वे (11) कुसूर ऋतिका संतोष पाटील (14) करुळ यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असणाऱ्या तिघांचे प्राण वाचले आहेत

4 तरुणी आणि 2 तरुण असे एकूण 6 जण करुळ जामदार वाडी येथील धरणात अंघोळी साठी गेले असता पोहण्या मोह आवरता आला नाही त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने तिघी जणी पाण्यात बुडाली बाराच वेळ दिसून न आल्याने शोधाशोद केली असता पाण्यात बुडाल्याचे सहकाऱ्याच्या लक्षात आले त्यांनी आरडावोरड केली. गावातील काहींनी धरणाच्या दिशेने धाव घेतली ताबडतोब त्या तिघीना बाहेर काढले परंतु प्राण वाचविण्याचे प्रयत्न अपयेशी ठरले नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. एकूणच या दुर्दैवी घटनेने करूळ गावावर शोककळा पसरली आहे या बाबत पोलीस तपास करीत आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |