संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिराचे डिझाईन आठ दिवसात अंतिम करावे जयकुमार गोरे

👤 अतुल फसाले सोलापुर | 📅 12 May 2026 | 👁 187 Views
संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिराचे डिझाईन आठ दिवसात अंतिम करावे  जयकुमार गोरे
श्री सावता महाराज मंदिरासाठी आवश्यक असलेली जमीन खरेदी प्रक्रिया तत्काळ सुरू करावी जगद्गुरु श्री महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी 15 एकर जागेची उपलब्धता चोखामेळा स्मारकासाठी मंगळवेढा शहरातील जमिनीची पाहणी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व स्थानिक आमदार यांनी करून घ्यावी
अरण येथील संत शिरोमणी श्री सावता महाराज यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाने 150 कोटीचा निधी मंजूर केला असून त्यातील 89 कोटीच्या निधीला प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने टेंडर प्रक्रिया सुरू करावी. तसेच मंदिराचे डिझाईन पुढील आठ दिवसात अंतिम करावे, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित संत शिरोमणी श्री सावता महाराज स्मारक तसेच जगद्गुरु महात्मा बसवेश्वर स्मारक आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. गोरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कार्तिकियेन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, माढा प्रांत अधिकारी जयश्री आव्हाड, मंगळवेढा प्रांत अधिकारी अमित माळी यांच्या सह अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री गोरे म्हणाले की, संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिरासाठी आवश्यक असलेल्या जागा खरेदीला शासनाकडून दहा कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने जागा खरेदीची कार्यवाही तात्काळ सुरू करावी. त्यानंतर अनुषंगिक कामाचे टेंडर प्रक्रिया करावी. येथे मंदिर हा मुख्य विषय असून याविषयी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, त्यामुळे मंदिराचे डिझाईनही खूप सुंदर, आकर्षक तसेच मोठ्या जागेचे असावे, असे त्यांनी निर्देशित केले.
मंगळवेढा येथे नियोजित जगद्गरु महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी प्रशासनाची 15 एकर जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या 15 एकर जागेवर भव्य स्मारक तसेच तलाव सुशोभीकरणसाठी आवश्यक निधीची मागणी करावी. त्याप्रमाणेच मंगळवेढा शहरात चोखामेळा समर्थासाठी किमान दोन एकर पेक्षा अधिक जागा उपलब्ध होत असेल तर त्या जागेची पाहणी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व आमदार यांनी करावी, अशा सूचनाही पालकमंत्री गोरे यांनी दिल्या.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |