नाझरा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे बारावी परीक्षेत यश

👤 संपादक - आण्णासाहेब मेटकरी | 📅 02 May 2026 | 👁 42 Views
नाझरा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे बारावी परीक्षेत यश
बारावी परीक्षेत उतुंग भरारी... विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज नाझरे ठरले यशस्वी...!!
दैनिक आखुर| नाझरा सोलापूर :- फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये नाझरा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजने घवघवीत यश संपादन करत यशाची परंपरा कायम राखली आहे.कला शाखेचा निकाल ९६.४३% लागला असून वाणिज्य शाखेचा निकाल ९१. ६७ % लागला आहे. ज्युनिअर कॉलेजचा सरासरी निकाल ९४.२३ टक्के लागला आहे. कला शाखेमधून साहिल संभाजी लवटे 63.33% गुण मिळवून ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रथम,प्रथमेश राहुल वाघमारे 65.83% गुण द्वितीय तर प्राजक्ता सत्यवान वाघमारे 61.83% गुण मिळवून तृतीय आली आहे.
वाणिज्य शाखेमधून गौरी हरी अडसूळ ७६.१७ % गुण मिळवून प्रथम, ऋषिकेश आगतराव चव्हाण ७१. ६७ % गुण मिळवून द्वितीय तर मुस्तफा दादासो मुलानी 71.33% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पर्यवेक्षक विनायक पाटील, प्रा. महेश विभुते, प्रा. नारायण पाटील, प्रा. मोहन भोसले,प्रा. युवराज लोहार, प्रा.रत्नप्रभा रेड्डी, या मार्गदर्शक शिक्षकांच्या उपस्थितीत प्रशालेमध्ये संपन्न झाला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, प्राचार्य अमोल गायकवाड, पर्यवेक्षक विनायक पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |