जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली स्वगणना नागरिकांनी १५ मेअखेर स्वगणना करण्याचे आवाहन

👤 संपादक - आण्णासाहेब मेटकरी | 📅 02 May 2026 | 👁 96 Views
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली स्वगणना  नागरिकांनी १५ मेअखेर स्वगणना करण्याचे आवाहन
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली स्वगणना नागरिकांनी १५ मेअखेर स्वगणना करण्याचे आवाहन

दैनिक आखुर | सांगली : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या देशव्यापी राष्ट्रीय जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून औपचारिक सुरुवात झाली असून, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऑनलाईन पद्धतीने 'स्व-गणना' पूर्ण करत सांगली जिल्ह्यातील जनगणनेचा शुभारंभ केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ऑनलाईन पद्धतीने स्वगणना प्रक्रियेवेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त संजिता महापात्रा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जनगणना 2027 ची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार असून नागरिकांच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. 'जनगणना २०२७' अंतर्गत पहिला टप्पा ‘स्व-गणना’ १ ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असून se.census.gov.in या संकेतस्थळावर व्यक्ती स्वत: व आपल्या कुटुंबाची माहिती भरू शकणार आहेत. तरी सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी स्वगणना करून राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, दि. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत घरयादी व घरगणना करण्यात येणार आहे. यामध्ये प्रगणक गृहभेटी देणार असून प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलित करणार आहे. जनगणनेतील सहभाग हे आपले कर्तव्य असून, प्रत्येक नागरिकाने आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना योग्य व अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेल्फी पॉईंटवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सत्यजीत देशमुख यांनी सेल्फी घेत नागरिकांना स्वगणनेचे आवाहन केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |