बनपुरी विकास सोसायटी, बनपुरीच्या चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाच्या निवडी आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष तथा आमदार मा. श्री. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडीत चेअरमन पदी मा. श्री. सूर्यकांत महादेव बुरुंगले यांची, तर व्हाइस चेअरमन पदी मा. श्री. नानासाहेब बाबा पावणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीनंतर परिसरातील कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून दोन्ही पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाइस चेअरमन यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.