पुकळेवाडीच्या कन्येचे दैदिप्यमान यश; डॉ. स्नेहा पुकळे यांची 'NEET-PG' २०२५ ( एनटी -२ प्रवर्ग)परीक्षेत महाराष्ट्रात चौथी रँक!

👤 आकाश दडस सातारा | 📅 25 May 2026 | 👁 279 Views
पुकळेवाडीच्या कन्येचे दैदिप्यमान यश; डॉ. स्नेहा पुकळे यांची 'NEET-PG' २०२५ ( एनटी -२ प्रवर्ग)परीक्षेत महाराष्ट्रात चौथी रँक!
माण तालुक्यातील पुकळेवाडी गावाची कन्या डॉ. स्नेहा भास्कर पुकळे हिने 'NEET-PG 2025' वैद्यकीय प्रवेश परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चौथा (४ था) NT-2 प्रवर्ग)( State Merit List १९५)क्रमांक पटकावून तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या घवघवीत यशामुळे तिची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर )येथे MD (General Medicine) या अत्यंत प्रतिष्ठेच्या शाखेमध्ये प्रवेशासाठी निवड झाली आहे.


डॉ. स्नेहा ही सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) श्री. भास्कर नाना पुकळे यांची कन्या आहे. अत्यंत चुरशीच्या असलेल्या या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत तिने महाराष्ट्रात चौथे स्थान मिळवून आपल्या बुद्धिमत्तेची आणि कष्टाची चुणूक दाखवून दिली.

तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल पुकळेवाडी गावासह संपूर्ण माण तालुक्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील मुलींनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उच्च ध्येय गाठले, तर त्या कोणत्याही क्षेत्रात अव्वल येऊ शकतात, हेच स्नेहाने आपल्या यशातून सिद्ध केले आहे, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.


तिच्या या यशाबद्दल समस्त ग्रामस्थ पुकळेवाडी यांच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वैद्यकीय प्रवासासाठी आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |