शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा होणार सन्मान गोडगे प्रतिष्ठान चा प्रेरणादायी उपक्रम

👤 संकेत तुकाराम सानप मुंबई | 📅 16 May 2026 | 👁 172 Views
शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा होणार सन्मान गोडगे प्रतिष्ठान चा प्रेरणादायी उपक्रम
सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील गुणवंतांचा भव्य सन्मान सोहळा २४ मे रोजी तळेगाव दिघे येथे होणार*. संगमनेर प्रतिनिधी श्री देवराम दादा गोडगे प्रतिष्ठान यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा गौरव करण्यासाठी वर्ष पाचवे “गुणवंत सन्मान सोहळा” मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. हा प्रेरणादायी सोहळा रविवार दिनांक २४ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत संस्कृती मंगल कार्यालय येथे पार पडणार आहे.
विविध क्षेत्रातील गुणवंत १३० विद्यार्थ्यांना व समाजातील विविध क्षेत्रांत निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या ८ व्यक्तींना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रतिष्ठानतर्फे सातत्याने हा सन्मान सोहळा आयोजित केला जात असून यंदाचे पाचवे वर्ष विशेष उत्साहात साजरे होत आहे.
डॉ. गोडगे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे समाजातील सकारात्मक कार्याला नवी दिशा आणि प्रेरणा मिळत आहे. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला अधिक बळ देण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानकडून सातत्याने केला जात आहे.
या सोहळ्यास परिसरातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अँड अविनाश शिवाजी गोडगे ( जिल्हा व सत्र न्यायालय संगमनेर) डॉ नंदकुमार शिवाजी गोडगे ( साईबाबा हॉस्पिटल तळेगाव दिघे) व आयोजकांनी केले आहे
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |