कवठेमहांकाळच्या आरोग्य सेवेला नवी दिशा; 100 बेड रुग्णालयासाठी आमदार गोपीचंद पडळकरांच्या पाठपुराव्याला पंचायत समितीची सलामी

👤 कवठेमहांकाळ प्रतिनिधी : जगन्नाथ सकट | 📅 30 July 2026 | 👁 306 Views
कवठेमहांकाळच्या आरोग्य सेवेला नवी दिशा; 100 बेड रुग्णालयासाठी आमदार गोपीचंद पडळकरांच्या पाठपुराव्याला पंचायत समितीची सलामी
पंचायत समितीच्या बैठकीत अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर; तालुक्यातील हजारो रुग्णांना मिळणार अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ
कवठेमहांकाळ तालुक्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या 100 बेड रुग्णालयाच्या मागणीला आता अधिक वेग आला आहे. कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयाचे 100 बेड रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत कवठेमहांकाळ पंचायत समितीच्या मासिक बैठकीत अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ते 100 बेड क्षमतेचे करण्याची मागणी तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय भोसेकर आणि त्यांच्या सहकारी टीमने आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे केली होती. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत आमदार पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच हा प्रस्ताव प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे कवठेमहांकाळसह जत, आटपाडी, सांगोला, तासगाव आणि सीमावर्ती भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार व आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.

बुधवारी झालेल्या कवठेमहांकाळ पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सदस्य प्रा. अर्जुन कर्पे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. सदस्य प्रभावती निकम यांनी या ठरावाला अनुमोदन दिले.

सभापती सिंधुताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपसभापती वामन कदम, सदस्य दिलीप झुरे, रविकिरण घागरे, वैशाली माने, प्रियंका गेंड यांच्यासह सर्व सदस्यांनी ठरावाला समर्थन देत तो टाळ्यांच्या कडकडाटात सर्वानुमते मंजूर केला. यावेळी पंचायत समितीचे विविध विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

कवठेमहांकाळ तालुक्याच्या आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून, सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली. पंचायत समितीच्या या अभिनंदन ठरावामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्याची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
रामटेक गडमंदिरात पारंपरिक काकड आरती महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ | अवघ्या तीन महिन्यांत २० बेपत्ता, अपहृत मुली, महिला व पुरुषांचा लावला यशस्वी शोध | रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला | चांदवडमध्ये भरदिवसा सुरेश खैरे यांची हत्या; घटनेने शहरात खळबळ, मृतदेह शासकीय रुग्णालयात | जळगावात लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांवर गुन्हे दाखल | जळगावात खून, दुचाकीचा किरकोळ वादातून तरुणाची हत्या, एक जखमी | मानापूर येथे श्रीराम सेनेतर्फे रावण वध; सूर्पणखेचाही वध | गुंडेवाडीतील खूनप्रकरणी सांगली एलसीबीची धडाकेबाज कामगिरी; मुख्य संशयितासह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात |