श्रीधर कन्या प्रशाला व ज्यु. कॉलेज, नाझरेचा दहावीचा निकाल ९८.२१ टक्के; मयुरेश बाबर प्रथम

👤 अतुल फसाले सोलापुर | 📅 08 May 2026 | 👁 201 Views
श्रीधर कन्या प्रशाला व ज्यु. कॉलेज, नाझरेचा दहावीचा निकाल ९८.२१ टक्के; मयुरेश बाबर प्रथम
श्रीधर शिक्षण प्रसारक मंडळ, नाझरे संचलित श्रीधर कन्या प्रशाला व ज्यु. कॉलेज, नाझरे या शाळेने इयत्ता १० वी मार्च २०२६ च्या बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा एकूण निकाल ९८.२१% लागला असून, सेमी माध्यमाचा निकाल १००% लागला आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचे यश
या परीक्षेत प्रशालेतील ५६ पैकी ५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये खालील विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे:
प्रथम क्रमांक: कुमार मयुरेश जनार्दन बाबर (९२.२०%)
द्वितीय क्रमांक: कुमारी महालक्ष्मी आनंदा सोनार (९१.६०%)
तृतीय क्रमांक: कुमारी आलिशा करीम शेख (८५.४०%)
प्रशालेचा गौरव
शाळेने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदानी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. "सा विद्या या विमुक्तये" हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अभिमानास्पद असून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे आहे, अशा भावना व्यक्त होत आहेत.
सर्व स्तरांतून गुणवंत विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला | चांदवडमध्ये भरदिवसा सुरेश खैरे यांची हत्या; घटनेने शहरात खळबळ, मृतदेह शासकीय रुग्णालयात | जळगावात लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांवर गुन्हे दाखल | जळगावात खून, दुचाकीचा किरकोळ वादातून तरुणाची हत्या, एक जखमी | मानापूर येथे श्रीराम सेनेतर्फे रावण वध; सूर्पणखेचाही वध | गुंडेवाडीतील खूनप्रकरणी सांगली एलसीबीची धडाकेबाज कामगिरी; मुख्य संशयितासह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात | ईश्वरपुरात रेकॉर्डवरील आरोपी पिस्तुलासह जेरबंद : सांगली एलसीबीची कारवाई. ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त; विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल. | पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मुद्रित जाहिरातींसाठी MCMC प्रमाणपत्र बंधनकारक - डॉ. मैनाक घोष |