राष्ट्रीय जनगणना 2027: आटपाडी येथे प्रगणक व पर्यवेक्षकांचे दुसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण संपन्न

👤 दै आखुर आटपाडी | 📅 29 April 2026 | 👁 76 Views
राष्ट्रीय जनगणना 2027: आटपाडी येथे प्रगणक व पर्यवेक्षकांचे दुसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण संपन्न


राष्ट्रीय जनगणना 2027 अंतर्गत आटपाडी तालुक्यातील जनगणना प्रक्रियेची तयारी जोरात सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून तहसील कार्यालय आटपाडी येथे प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचे दुसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण आज तहसील कार्यालयातील सभागृहात पार पडले.
या जनगणना उपक्रमासाठी आटपाडी तालुक्यात एकूण 230 प्रगणक आणि 39 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण, पंचायत आणि महसूल अशा विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांचा या कामात समावेश करण्यात आला आहे.
सदर प्रशिक्षण माननीय तहसीलदार शितल बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय नायब तहसीलदार दादासाहेब पुकळे यांच्या सहकार्याने पार पडले. यावेळी खाडे मॅडम यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्याचे तीन दिवसीय प्रशिक्षण 23 ते 25 एप्रिल दरम्यान यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, तिसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण 04 मे ते 06 मे या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
जनगणना प्रक्रियेअंतर्गत स्वगणना 01 मे ते 15 मे दरम्यान होणार असून, त्यानंतर 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणकांमार्फत घरांची नोंदणी करण्यात येईल.
तालुक्यातील सर्व नागरिकांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून प्रगणकांना आवश्यक माहिती अचूकपणे द्यावी, तसेच 01 मे ते 15 मे दरम्यान होणाऱ्या स्वगणनेत उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार शितल बंडगर यांनी केले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |