इंधन तुटवड्याच्या अफवांना बळी पडू नका; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

👤 वैभववाडी प्रतिनिधी - तुषार शिंगाडे | 📅 07 May 2026 | 👁 182 Views
इंधन तुटवड्याच्या अफवांना बळी पडू नका; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
जिल्ह्यात उन्हाळी पर्यटन हंगाम सुरू असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काही काळ इंधन पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याची स्थिती होती. मात्र जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत.
जिल्हा प्रशासनाने भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOCL) या कंपन्यांच्या विक्री प्रतिनिधींशी तसेच जिल्ह्यातील पेट्रोल पंपधारकांशी सातत्याने संपर्क साधून पुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे इंधनाची उपलब्धता स्थिर करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
दरम्यान, जिल्ह्यात इंधन टंचाईबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या अफवांवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अफवांमुळे अनावश्यक भीती निर्माण होऊन पेट्रोल पंपांवर गर्दी वाढत असून, त्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि इंधन खरेदीसाठी अनावश्यक गर्दी टाळावी. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला | चांदवडमध्ये भरदिवसा सुरेश खैरे यांची हत्या; घटनेने शहरात खळबळ, मृतदेह शासकीय रुग्णालयात | जळगावात लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांवर गुन्हे दाखल | जळगावात खून, दुचाकीचा किरकोळ वादातून तरुणाची हत्या, एक जखमी | मानापूर येथे श्रीराम सेनेतर्फे रावण वध; सूर्पणखेचाही वध | गुंडेवाडीतील खूनप्रकरणी सांगली एलसीबीची धडाकेबाज कामगिरी; मुख्य संशयितासह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात | ईश्वरपुरात रेकॉर्डवरील आरोपी पिस्तुलासह जेरबंद : सांगली एलसीबीची कारवाई. ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त; विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल. | पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मुद्रित जाहिरातींसाठी MCMC प्रमाणपत्र बंधनकारक - डॉ. मैनाक घोष |