नेवासा | मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आमदार विठ्ठलराव लंघे पाटील

👤 संकेत सानप | 📅 07 May 2026 | 👁 317 Views
नेवासा | मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आमदार विठ्ठलराव लंघे पाटील
नेवासा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा शिवसेना अहिल्यानगर जिल्हा संपर्क मंत्री मा.ना.श्री. उदयजी सामंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी संघटनात्मक बळकटी, बूथस्तरापर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे अधिक सक्षम करण्याची दृष्टीने पुढील नियोजन, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती तसेच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ मतदारसंघातील प्रत्येक नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी पदाधिकारी, शिवसैनिक घेत असलेली मेहनत आणि कार्यतत्परता निश्चितच कौतुकास्पद असून शिवसेना मुख्य नेते मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, मा.ना.श्री. उदय सामंत साहेब, मा.खा.डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची ताकद अधिक वृद्धिंगत करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी माजी खासदार श्री. सदाशिव लोखंडे, श्री. नितीनजी औताडे, श्री. संजीव भोर, श्री. प्रभाकर काका शिंदे, श्री. करणसिंह घुले, श्री. भाऊसाहेब वाघ, श्री. बाळासाहेब पवार यांच्यासह शिवसेना युवासेना, महिला आघाडी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |