जगातील आश्चर्यापैकी एक आश्चर्य म्हणजे बंदिस्त देवळातील बिरोबा देवाला दररोज सूर्य आपले दर्शन देतो म्हणजेच सूर्य उगवला की मूर्तीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत सूर्यप्रकाश हळूहळू वर जात असतो
आटपाडी तालुक्याच्या पश्चिमेकडील कुरुंदवाडी व विभूतवाडीच्या सीमेवर पाच गावाचा कुळस्वामी देव म्हणजेच बिरोबा होय प्राचीन काळातील हे मंदिराचे बांधकाम झाले आहेसंपूर्ण मंदिर दगडी आहे या बिरोबाच्या दर्शनासाठी अनेक नागरिक राज्य व राज्यातूनही येत असतात दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये या बिरोबा देवाची यात्रा भरते पाचगावा चा बिरोबा देव असा मानला जातो
यामध्ये कुरुंदवाडी गुळेवाडी विभूतवाडी झरे व पारेकरवाडी या गावचे देवस्थान आहे असे पूर्वीपासून मानले जात आहे.
या ठिकाणी चार ते पाच पुजारी रात्रंदिवस देवाची पूजा करतात पुजारकीचे वर्षाला साल बदलते. उन्हाळ्यामध्ये चैत्र यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये भरली जाते. ही यात्रा सलग तीन दिवस असते. तर पाच गावांमधून जे बाहेरगावी आपली उपजीविका भागवण्यासाठी गेलेले नागरिक आहेत ते या यात्रेला हमखास उपस्थित राहत असतात व तीन दिवस चालणाऱ्या यात्रेचा आनंद लुटत असतात.
अनेक जण या बिरोबादेवाला नवस करीत असतात काही जणांचे नवस पूर्ण होतात ते नागरिक हौसेने या यात्रेसाठी पैसे खर्च करत असतात किंवा देवाला सोन्याचं किंवा चांदीचा दागिना घालत असतात अशा या देवाची ख्याती आहे.
देऊळ हे बंदिस्त आहे परंतु अनेक वर्षापासून किंवा देऊळ बांधकाम झाल्यापासून येथे एक चमत्कार घडतो परंतु अनेक नागरिक अनेक भाविक भक्त याकडे कोणीही जास्त लक्ष देत नव्हते. परंतु अलीकडच्या काळात सोशल मीडिया आली आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून या मंदिरातील पूर्वीपासून जो चमत्कार घडतो तो काही पुजाऱ्यांनी मोबाईल मध्ये शूट करून तो नागरिकांच्या निदर्शनाला आणण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक लोकांना हे आज तागायत माहीतच नव्हते.
परंतु सध्याच्या युगामध्ये प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि या स्मार्टफोनच्या माध्यमातून एका पुजाऱ्याने तेथे घडणारा चमत्कार हा मोबाईल मध्ये कैद केला व त्याचे फोटो दैनिक केसरीच्या हाती लागले.
नक्की काय प्रकार आहे बिरोबाचे मंदिर हे बंदिस्त मंदिर आहे आणि मंदिराच्या आत मध्ये गाभाऱ्यात देवाची मूर्ति आहे. आणि या मूर्तीला दररोज सूर्य देव दर्शन देतात अशी एक या देवाची ख्याती आहे.
नक्की घडते असं की सकाळी सूर्य उगवल्यानंतर सूर्याची किरणे बंदिस्त मंदिरातून आत कुठून जातात हे कोणालाच माहित नाही परंतु त्या मूर्ती वरती सूर्यकिरण पडत असतात हे मंदिर बांधकाम झाल्यापासून सुरू आहे परंतु हे कोणाच्या लक्षात आले नव्हते परंतु एका चाणाक्ष पुजाऱ्याने याचे दररोज सकाळी निरीक्षण केले व त्याचे फोटो काढले.
त्या पुजाराच्या निदर्शनाला असे आले की पहिल्यांदा जिथे मूर्ती बसली आहे त्या कट्ट्यावरती सूर्यप्रकाश पडतो त्यानंतर तो सूर्यप्रकाश हळूहळू हळू वर जात मुर्तीच्या चेहऱ्यावर पडतो आणि त्यानंतर तो सूर्य प्रकाश दिसायचा बंद होतो. असा प्रकार पूर्वीपासून सुरू आहे. परंतु याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही परंतु तेथील सध्या जे पुजारी कार्यरत आहेत त्यांनी हे निरीक्षण करून कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहे.
यावर कोणी विश्वास ठेवणार का ?
अशा गोष्टीवर कोणी विश्वास ठेवणार का ? असाही प्रश्न निर्माण होत आहे परंतु यापूर्वी तो पडणारा सूर्यप्रकाश तो कशामध्ये कैद करायचा नागरिक त्यावर विश्वास ठेवतील का असाही प्रश्न गंभीर होत होता .परंतु सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि या स्मार्टफोनच्या आधारे एका पुजाऱ्याने हे सर्व चित्र कैद केले होते त्याचे फोटो दैनिक केसरीच्या हाती लागले.
यानंतर दैनिक केसरीचे पत्रकार यांनी अनेक नागरिकांशी चर्चा केली तर हे सत्य असल्याचे सांगण्यात आले. हा एक दैवी चमत्कारच आहे असे नागरिक मानतात तर बिरोबा देवावर विश्वास असणारे अनेक नागरिक दर अमावस्या पौर्णिमेला तसेच दर रविवारी दर्शनासाठी गर्दी असते.
तर चैत्र महिन्यामध्ये भरणाऱ्या यात्रेला मुंबई पुणे व इतर भागांमध्ये उपजीविका भागवण्यासाठी गेलेले नागरिक आवर्जून या यात्रेला येत असतात. अनेक जण नवस करतात ते फेडण्यासाठी येत असतात पाच गावचं हे श्रद्धास्थान आहे .असे मानले जाते आणि इथे घडलेला चमत्कार नसून हे पूर्वीपासून सूर्यप्रकाशाची किरणे या मूर्तीवर पडतात हे सत्य आहे आणि ते मोबाईल मध्ये कैद झाले आहे.
तर पूर्वीचे ही नागरिक सांगतात की पूर्वीपासून सूर्यप्रकाश मूर्तीवर पडतो मूर्तीला सूर्य दर्शन देतो अशी या देवाची ख्याती आहे .परंतु हे जर प्रसिद्ध केले तर कोणाचा विश्वास बसणार नाही म्हणून आम्ही कोणालाही बोललो नाही. परंतु जे पुजारी तेथे सेवा करतात यांना तो प्रकार माहित आहे.
आणि हा प्रकार आज मोबाईलच्या माध्यमातून कैद झाला आहे हा प्रकार सत्य आहे असे नागरिक व तेथे पूजा करणारे पुजारी यांचे ठाम मत आहे.