सिंधी समाजाच्या संघर्षाला न्याय; मालकी हक्काच्या पट्ट्यांचा ऐतिहासिक निर्णय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

👤 संकेत सानप मुंबई | 📅 12 May 2026 | 👁 83 Views
सिंधी समाजाच्या संघर्षाला न्याय; मालकी हक्काच्या पट्ट्यांचा ऐतिहासिक निर्णय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विदर्भ सिंधी विकास परिषद, नागपूरतर्फे आयोजित 'कब्जा धारक - लीज पट्टा (मालकी हक्क) वितरण व नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ' येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी आमदार कुमार आयलानी, मध्य प्रदेशमधील भोपाळ दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार भगवानदास सबनानी, अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी व इतर मान्यवर उपस्थित होते.
सिंधी समाजाच्या संघर्षाला न्याय; मालकी हक्काच्या पट्ट्यांचा ऐतिहासिक निर्णय!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे विदर्भ सिंधी विकास परिषद, नागपूरतर्फे आयोजित 'कब्जा धारक - लीज पट्टा (मालकी हक्क) वितरण व नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, निर्वासित म्हणून भारतात दाखल झालेल्या सिंधी समाजाने शून्यापासून सुरुवात केली. हाच समाज आज देशाच्या व्यापार क्षेत्रासह सर्वच क्षेत्रामध्ये हा समाज आघाडीवर असून देशाच्या विकासात मोलाचे योगदान देत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सिंधी बांधवांना नागरिकत्व प्रदान करण्याचे अभियान देशभर राबवले गेले. सिंधी बांधव वास्तव्यास असलेल्या जमिनी अतिक्रमण म्हणून गणल्या जात होत्या. त्यामुळे सिंधी बांधवांना मालकी पट्टे मिळावे, अशी मागणी सुरू होती. संधी मिळताच आम्ही या प्रश्नावर तोडगा काढला आणि सिंधी बांधवांना वर्ग एकच्या शंभर टक्के मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सिंधी बांधवांना मालकी हक्काचे पट्टे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

आगामी काळातही अत्यंत वेगाने या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. तसेच उल्हासनगर येथील सिंधी बांधवांसाठी वेगळ्या पद्धतीने नियमितीकरण करण्याचा निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

यावेळी आमदार कुमार आयलानी, मध्य प्रदेशमधील भोपाळ दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार भगवानदास सबनानी, अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी व इतर मान्यवर उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |