खरसुंडीतील चांदी प्रकरणात पुजारी समाजाची भूमिका स्पष्ट

👤 आटपाडी प्रतिनिधी | 📅 08 May 2026 | 👁 263 Views
खरसुंडीतील चांदी प्रकरणात पुजारी समाजाची भूमिका स्पष्ट
“ट्रस्ट कडे असलेल्या दानातील चांदीशी गुरव समाजाचा संबंध नाही; ट्रस्टने खुलासा करावा”
खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदिर येथील कथित चांदी प्रकरणावरून प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांत विविध चर्चा सुरू असताना गुरव समाजाच्या वतीने कृष्ण मंदिर येथे पत्रकार परिषद घेऊन समाजाची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आली. यावेळी देवस्थान ट्रस्टमध्ये भक्तांकडून दान स्वरूपात येणाऱ्या वस्तूंशी गुरव समाजाचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत पुजारी समाजाची होत असलेली नाहक बदनामी थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.
गुरव समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, गेली शेकडो वर्षे गुरव समाज श्री सिद्धनाथांची नित्य सेवा, पूजा व मंदिराची दिनचर्या पार पाडत आला आहे. मंदिरातील सेवेकरी, मानकरी व भाविक यांच्याशी समन्वय ठेवून कोणतीही तक्रार किंवा वाद निर्माण न होता ही सेवा अखंड सुरू आहे.

पत्रकार परिषदेत पुजारी बांधवांनी सांगितले की, मंदिरातील पूजेचा मान गुरव समाजाला असला तरी खरसुंडी गावात साडेतीनशेहून अधिक गुरव बांधवांची घरे आहेत. काहींना वर्षातून, काहींना दोन किंवा चार वर्षांतून तर काहींना दहा-पंधरा वर्षांतून आठ दिवस पूजेचा मान मिळतो. अत्यंत कमी उत्पन्नाच्या काळातही पुजारी बांधवांनी पदरमोड करून नाथसेवेत खंड पडू दिला नाही, असा इतिहास असल्याचे त्यांनी नमूद केले.

सध्या सुरू असलेल्या चांदी प्रकरणामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जात असून, मंदिरातील पुजाऱ्यांचा देवस्थान ट्रस्टमध्ये जमा होणाऱ्या दानातील वस्तूंशी कोणताही संबंध नसतानाही त्यांच्यावर संशय घेतला जात असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. संबंधित प्रकरणाबाबत देवस्थान ट्रस्टने भाविक व प्रसारमाध्यमांसमोर योग्य तो खुलासा करावा, अशी मागणीही गुरव समाजाच्या वतीने करण्यात आली.
भाविकांमध्ये निर्माण झालेला गैरसमज दूर करण्यासाठी तसेच समाजाची अधिकृत भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे समाजाच्या वतीने सांगण्यात आले.

या पत्रकार परिषदेस किशोर पुजारी, अर्जुन सावकार, लक्ष्मण पुजारी, महादेव जरंडकर, सुनील पाटील, दत्तात्रय पुजारी, राजू सावकार, तुकाराम पुजारी, विवेक पुजारी, अभिजीत पुजारी, राजू पुणेकर, गजानन पाटील, गजानन पुजारी, किरण पुजारी, चंद्रकांत पुजारी, अमोल पुजारी, अभिषेक सावकार, जगन्नाथ पुजारी, शिवाजी पुजारी, रावसाहेब पुजारी, नरहरी पुजारी, रोहित पुजारी, घनश्याम पुजारी, आदिनाथ पुजारी, सागर पुजारी, प्रवीण पुजारी, कैलास पुजारी, सिद्धेश्वर पुजारी, प्रवीण जरंडकर, अक्षय पुजारी, विशाल पुजारी, रविराज पुजारी, बापूराव पुजारी, प्रशांत जरंडकर, दिगंबर भांगे यांच्यासह गुरव समाजातील अनेक बांधव उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |