पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा गौरव

👤 तुषार शिंगाडे | 📅 07 May 2026 | 👁 126 Views
पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा गौरव
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या निमित्ताने पंचायत समिती देवगड येथे विविध विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समितीचे सभापती गणेश राणे व उपसभापती अमोल लोके यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.
या प्रसंगी सिंधुदूर्ग जिल्हाचे पालकमंत्री ना .नितेश राणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला, माजी .आमदार अजित गोगटे , गटविकास अधिकारी देवगड अरुण चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते नंदुशेट घाटे, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उपअभियंता बांधकाम अनिल तांबे , सहाय्यक आयुक्त पशुधन अधिकारी डॉ . माधव घोगरे , कृषी अधिकारी दिगंबर खराडे , सहाय्यक लेखाधिकारी विवेक चिंदरकर , व्यवस्थापक हेमंत हळदणकर ,शिक्षक सचिन जाधव सर, विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) दीपक तेंडुलकर , सहा . अभियंता रोशन सुर्यवंशी ,वरिष्ठ सहाय्यक स्वप्नजा बिर्जे , स्वीय सहाय्यक दीपक मयेकर, ग्रामपंचायत अधिकारी श्रद्धा आळवे , मुख्यसेविका पुजा सावंत ,एपिओ अनंत लाड , कनिष्ठ अभियंता अभिनव बागवे , समुह समन्वयक विनायक धुरी, परिचर निवेदिता जाधव , आशा सेविका मणाली पाळेकर , रेश्मा कदम , सायली नारकर , मदतनीस वैशाली तेली , श्रृती श्रीराम चव्हाण आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच माझे आरोग्य संपन्न गांव अभियान अंतर्गत उल्लेखनिय काम केलेल्या आरोग्य सेविका स्मिता खडपे ( प्रा .आ .केंद्र पडेल ,उपकेंद्र गिर्ये ), आरोग्य सेविका प्रतिमा खरात( प्रा .आ .केंद्र मोंड ,उपकेंद्र पेंढरी ), आरोग्य सेविका सुनंदा मोये ( प्रा .आ .केंद्र इळये ,उपकेंद्र जामसंडे ) , आरोग्य सेविका संगिता घागरे ( प्रा .आ .केंद्र मिठबांव ,उपकेंद्र नारींग्रे ), आरोग्य सेविका ए .व्ही. महाडीक ( प्रा .आ .केंद्र फणसगांव ,उपकेंद्र गवाणे ) , आरोग्य सेविका एस .आर. तावडे ( प्रा .आ .केंद्र शिरगांव ,उपकेंद्र. तळवडे ) यांचा सन्मान करण्यात आला . तसेच दहावी ( २०२५ ) मध्ये १०० % गुण प्राप्त केल्याबद्दल आर्या राणे हिचा गौरव करण्यात आला .
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’, ‘ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आजची गरज’ आणि ‘स्त्री शिक्षण हाच खरा विकास मार्ग’ या विषयांवर महिलांनी प्रभावी मांडणी केली. या स्पर्धेत प्रथम पूर्वा साटम ( अंगणवाडी सेविका ) , द्वितीय क्रमांक दुर्वा परब ( आशा सेविका मुणगे ) , तृतीय क्रमांक वैदीही ओगले , उत्तेजनार्थ मयुरी यादव ( आशा सेविका टेंबवली ),जान्हवी पाटील या विजेत्यांना सभापती गणेश राणे , उपसभापती अमोल लोके , गटविकास अधिकारी अरूण चव्हाण , कक्ष अधिकारी संतोष बिर्जे तसेच मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.या स्पधेत परीक्षक म्हणून शिक्षक राजेंद्र हिंदळेकर यांनी काम पाहिल . तसेच या स्पधेसाठी मधुसुदन घोडे सर,आनंद जाधव सर यांचे विशेष सहकार्य लाभले .
या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढण्यास तसेच समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाची प्रस्तावणा शिक्षक सचिन जाधव , सुत्रसंचलन शिक्षक स्वाती हिंदळेकर ,आभार कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांनी मानले .
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |