शिक्षक भरती 'जिल्हा संवर्ग' करून स्थानिकांना प्राधान्य द्या: आ. प्रमोद जठार

👤 संकेत तुकाराम सानप (मंत्रालय मिडिया प्रति व संपादक मुंबई) | 📅 26 June 2026 | 👁 147 Views
शिक्षक भरती 'जिल्हा संवर्ग' करून स्थानिकांना प्राधान्य द्या: आ. प्रमोद जठार
मुंबई- राज्यातील शिक्षकांची भरती राज्य स्तरावर न करता जिल्हा संवर्ग पद्धतीने करावी आणि स्थानिक उमेदवारांना ८० टक्के प्राधान्य द्यावे, अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत केली. ते म्हणाले, सध्या सिंधुदुर्ग- रत्नागिरीत ८० टक्के शिक्षक बाहेरील जिल्ह्यांतील असून स्थानिक तरुण रोजगारासाठी मुंबईत स्थलांतर करत असल्याचे सभागृहात निदर्शनास आणून दिले. स्थानिकांना थेट नोकरीत प्राधान्य देण्याऐवजी 'जिल्हा संवर्ग पद्धत राबवल्यास हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकेल आणि स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न सुटेल, असा कायदेशीर मार्गही त्यांनी सुचवला. या निर्णयामुळे गावातील शाळा खऱ्या अर्थाने भरभराटीला येतील आणि रोजगाराअभावी कोकणात बंद असलेली ८० टक्के घरे पुन्हा उघडतील, असा विश्वास व्यक्त करत शासनाने याबाबत तातडीने धोरणात्मक बदल करावा, अशी आग्रही भूमिका जठार यांनी मांडली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |