> "हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझे सहकारी आणि हितचिंतक यांचा आहे. या पुरस्कारामुळे समाजाप्रती असलेली माझी जबाबदारी अधिक वाढली असून, भविष्यातही हे सेवाकार्य असेच अविरत सुरू राहील."
> रामराजे भोसले (पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केलेली भावना)
पुण्यातील प्रसिद्ध समाजसेवक रामराजे भोसले यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. 'हिंदुस्थान बुक ऑफ टॅलेंट' आणि भारत सरकारच्या 'विशेष समाजकल्याण परिषद' यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा अत्यंत मानाचा 'उत्कृष्ट समाजसेवक (युथ आयकॉन महाराष्ट्र)' पुरस्कार काल रामराजे भोसले यांना मोठ्या उत्साहात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.गेल्या अनेक वर्षांपासून रामराजे भोसले हे पुणे आणि परिसरात गरजू, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी अविरतपणे धावून जात आहेत. नियमित अन्नदान, गोरगरिबांना थेट मदत आणि विविध सामाजिक चळवळींच्या माध्यमातून त्यांनी समाजात एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. तरुणांना प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या याच उल्लेखनीय आणि निस्वार्थी कार्याचा गौरव म्हणून त्यांना या वर्षाचा 'युथ आयकॉन महाराष्ट्र' पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या मानाच्या पुरस्कारामुळे रामराजे भोसले यांच्यावर पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदनाचा प्रचंड वर्षाव होत आहे.