राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण

👤 नंदकुमार विभुते आटपाडी | 📅 26 July 2026 | 👁 89 Views
राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण
> "शाळा आणि राष्ट्रीय कर्तव्य या दोन्ही आघाड्यांवर सुरुवातीला दडपण होते, परंतु गावातील नागरिकांचे सहकार्य आणि सहकाऱ्यांची खंबीर साथ यामुळेच आम्ही हे आव्हान पेलू शकलो. तालुक्यात प्रथम येण्याचा आनंद शब्दातीत आहे." > श्री. आजिनाथ आंधळे (BLO, मुढेवाडी)
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रभर सुरु केलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहीम अंतर्गत मुढेवाडी (ता. आटपाडी) गावाने संपूर्ण तालुक्यात बाजी मारली आहे. शिक्षक, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या अभूतपूर्व एकोप्यातून हे अत्यंत अवघड आणि वेळखाऊ राष्ट्रीय काम आटपाडी तालुक्यात सर्वात आधी पूर्ण करण्याचा मान मुढेवाडी गावाने पटकावला आहे.

शिक्षकी पेशा आणि राष्ट्रीय कर्तव्य: आव्हानात्मक सुरुवात
तहसीलदार शितल बंडगर यांच्या आदेशानुसार मुढेवाडी येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून श्री. आजिनाथ आंधळे यांची नेमणूक करण्यात आली होती. सुरुवातीला शाळा सुरु झालेली असताना मुलांचे नुकसान होऊ न देणे आणि दुसरीकडे हे अत्यंत आव्हानात्मक राष्ट्रीय काम वेळेत पूर्ण करणे, असा दुहेरी ताण आंधळे गुरुजींवर होता. २९ जून रोजी साहित्य ताब्यात घेतल्यानंतर ३० जून ते २९ जुलै या निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे दडपण होते.
तसेच, मुढेवाडीतील अनेक तरुण उदरनिर्वाहासाठी मुंबई, पुणे, सांगली यांसारख्या शहरांत स्थलांतरित झालेले असल्याने त्यांची माहिती गोळा करणे हे सर्वात मोठे आव्हान होते.
सांघिक काम आणि नियोजनाचा विजय
या कामाची काठिण्य पातळी लक्षात घेऊन तहसीलदार मॅडम यांनी मुढेवाडीचे पोलीस पाटील श्री. युवराज मुढे आणि ग्रामपंचायत कर्मचारी श्री. साहिल लोखंडे यांची 'सहाय्यक BLO' म्हणून नियुक्ती केली.त्रयींनी एकत्र येत नियोजनबद्ध कामाची आखणी केली:
फॉर्मचे वर्गीकरण: सर्वात आधी Self Form, Progeny Form आणि Anomaly Form वेगळे करून कामाला गती दिली.
वस्तीवर जाऊन जनजागृती: प्रत्येक वस्तीवर प्रत्यक्ष जाऊन नागरिकांना या सर्वेक्षणाचे महत्त्व पटवून दिले. दुबार, मयत व चुकीची नावे वगळून मतदार यादीचे पूर्ण नूतनीकरण होणार असल्याचे सांगताच ग्रामस्थांनी सहकार्याचा हात पुढे केला.

ग्राम बैठकांचा प्रभाव: कामाचा वेग वाढवण्यासाठी गावात विशेष बैठका घेण्यात आल्या. "राष्ट्रीय कामात मुढेवाडीचा नावलौकिक करायचाच," असा निर्धार संपूर्ण गावाने केला.
८९८ मतदारांचा अचूक डेटा आणि तालुक्यात प्रथम क्रमांक!
मुढेवाडी गावात एकूण ८९८ मतदारांची नोंद होती. त्यापैकी स्थलांतरित, दुबार आणि मयत असे १२१ मतदार शोधून काढण्यात आले, तर उर्वरित ७७७ मतदारांचे संपूर्ण पुरावे आणि माहिती तंतोतंत मॅच करण्यात आली. शेवटच्या टप्प्यात माहिती मिळणे कठीण असलेल्या मतदारांचा शोध घेण्यासाठी BLO आदिनाथ आंधळे, सहाय्यक BLO युवराज मुढे, साहिल लोखंडे आणि सहशिक्षक श्री. लोखंडे सर यांनी अहोरात्र मेहनत घेतली.

या सांघिक प्रयत्नांमुळे आटपाडी तालुक्यात 'SIR' चे काम सर्वात प्रथम पूर्ण करण्याचा गौरव मुढेवाडी गावाला मिळाला.

प्रशासनाकडून सत्कार आणि कौतुकाचा वर्षाव
मुढेवाडी गावाने आणि BLO पथकाने दाखवलेल्या या आदर्श तत्परतेबद्दल आटपाडीच्या मा. तहसीलदार शितल बंडगर यांनी BLO आदिनाथ आंधळे, सहाय्यक BLO युवराज मुढे, साहिल लोखंडे आणि सहकार्य करणारे लोखंडे सर यांचा विशेष सन्मान केला. तसेच, या राष्ट्रीय मोहिमेत आदर्श सहकार्य करणाऱ्या मुढेवाडी ग्रामस्थांचेही प्रशासनाकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद |