उदनवाडी येथे मायाक्का देवीची यात्रा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न

👤 संपादक - आण्णासाहेब मेटकरी | 📅 03 May 2026 | 👁 62 Views
उदनवाडी येथे मायाक्का देवीची यात्रा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न


उदनवाडी (ता. सांगोला) : ग्रामदैवत मायाक्का देवीची वार्षिक यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी देवीला तेल लावण्याच्या विधीने यात्रेची सुरुवात झाली.
मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी यात्रेनिमित्त युवक नेते प्रशांत भाऊ वलेकर व अक्षयभाऊ वलेकर यांच्या पुढाकारातून बैलगाडी व घोडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. रंगतदार शर्यतींनी उपस्थित प्रेक्षकांचे मन जिंकले. संध्याकाळी पांडुरंग एकतारी भजनी मंडळ, उदनवाडी यांचा एकतारी भजनाचा कार्यक्रम पार पडला.
बुधवार, दि. २९ एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस असून नैवेद्याचा कार्यक्रम पार पडला. या दिवशी मायाक्का देवी ओविकार मंडळ (उदनवाडी) व बिरुदेव ओविकार मंडळ (गौडवाडी) यांच्या ओवी गायनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी ७ वाजता मायाक्का देवीची पालखी गावातून भव्य मिरवणुकीने काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी, हलगी-ढोल वादन आणि जयघोषामुळे संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते. या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक, महिला व लहानथोर नागरिक सहभागी झाले.
रात्री ९ वाजता कोल्हापूर येथील ‘किशोर कुमार म्युझिकल नाईट’ या आर्केस्ट्राचा कार्यक्रमही रंगला. गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी खिरीच्या महाप्रसादाने यात्रेची सांगता करण्यात आली.
ही यात्रा यशस्वी करण्यासाठी मायाक्का देवी यात्रा कमिटी, उदनवाडी तसेच गावातील व परिसरातील सर्व नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांचे आभार मानत पुढील वर्षीही अशीच भव्य यात्रा आयोजित करण्याचा संकल्प समितीने व्यक्त केला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |