७/१२ उताऱ्याचे लॉक काढण्यासाठी लाच घेताना मंडळ अधिकारी जाळ्यात

👤 संपादक - आण्णासाहेब मेटकरी | 📅 28 April 2026 | 👁 21 Views
७/१२ उताऱ्याचे लॉक काढण्यासाठी लाच घेताना मंडळ अधिकारी जाळ्यात
७/१२ उताऱ्याचे लॉक काढण्यासाठी लाच घेताना मंडळ अधिकारी जाळ्यात
एसीबीची मोठी कारवाई : ३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

बार्शी /दै आखुर

जमिनिच्या ७/१२ उताऱ्यावर वारस म्हणून आजीचे नाव नोंदवण्यासाठी आणि उताऱ्याचे लॉक काढून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेताना उपळे (दुमाला) येथील मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. हेमंत चंद्रकांत फुलारी (वय ५३) असे लाच घेणाऱ्या लोकसेवकाचे नाव असून, या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

यातील तक्रारदार यांच्या आजीचे वडील मयत झाल्याने, वारस म्हणून आजीचे नाव सातबारा उताऱ्यावर लावणे आवश्यक होते. तलाठी यांनी घातलेली ही वारस नोंद प्रमाणित करण्यासाठी आणि तांत्रिक कारणास्तव लागलेले उताऱ्याचे लॉक काढून देण्यासाठी (अनलॉक करणे) मंडळ अधिकारी हेमंत फुलारी यांनी ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याप्रकरणी सोलापूर एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.

मंगळवारी (दि. २८ एप्रिल २०२६) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केली असता, फुलारी यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचून ही लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.

याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस निरीक्षक रविंद्र लाभाते व त्यांच्या पथकाने यशस्वी केली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |