बिटल जातीचे शेळीचे 11 महिन्याचे पिल्लू देतेय दूध...

👤 आटपाडी प्रतिनिधी | 📅 07 May 2026 | 👁 314 Views
बिटल जातीचे शेळीचे 11 महिन्याचे पिल्लू  देतेय दूध...
याबाबत अनेक पशुवैद्यकीय डॉक्टरांना विचारले असता असं एखादं पिल्लू असू शकतं असं पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्या म्हणण्यातून आले. शेळीच्या शरीरामध्ये हार्मोन्स कमी जास्त झाल्याने लाखात एखादी घटना अशी घडू शकते.. डॉ. विकास पाटील
जगामध्ये आश्चर्यजनक अशा भरपूर घटना घडतात, तसेच यापूर्वीही अशा आश्चर्यजनक घटना भरपूर घडलेले आहेत, असे जे घटना आटपाडी तालुक्याच्या पश्चिमेकडील झरे ता.आटपाडी येथे घडली आहे.
झरे ता.आटपाडी येथील संतोष भाट हे शेतकरी असून भडजीचे काम म्हणजे साखरपुडा असो लग्न असो किंवा इतर कोणतेही शुभकार्य असो तेथे विधी म्हणणे अशी कामे करतात तर त्यांना गावकी म्हणून चार ते पाच गावे दिले आहेत.

परंतु यावर उपजीविका भागत नाही त्यामुळे ते शेतीतूनही थोड्याफार प्रमाणामध्ये उत्पन्न घेतात आणि शेती करत करत त्यांनी घरगुती तीन ते चार शेळ्या पाळल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी काही अहिल्यानगर वरून शेळ्या विकत आणले आहेत.

त्यामध्ये बीटल जातीचे एक पिल्लू त्यांनी आणले होते ते पिल्लू आता अकरा महिन्याचे झाले आहे ते पिल्लू गाभणही राहिले नाही, आणि ते शेळीचे पिल्लू आता दूध देत आहे, ही एक आश्चर्यजनक घटना घडली असून याची चर्चा परिसरामध्ये सुरू आहे. आणि त्या बीटेल जातीच्या शेळीच्या पिल्लाला बघण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली आहे.

संतोष भाट यांना पूर्वीपासून शेतीची आवड असल्याने शेतीबरोबर पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी शेळीपालन सुरू केले म्हणजे बंदिस्त शेळीपालन नव्हे तर घरगुती चार ते पाच शेळ्या पाळल्या आहेत .त्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं म्हणून अहिल्यानगर वरून तीन शेळ्या आणल्या होत्या .त्यामध्ये बीटल जातीचे एक पिल्लू आणले होते. सध्या ते पिल्लू 11 महिन्याचे झाले आहे .

परंतु ते शेळीचे पिल्लू गाभण न राहता ते पिल्लू आता दूध देत आहे .हे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे .आणि या बिटेल जातीच्या पिल्लाची सर्वत्र चर्चा सुरू आहे तर या पिल्लाला बघण्यासाठी नागरिकांची वर्दळ सुरू झाली आहे.

प्रत्येक शेळीचा विचार केला तर 6 महिन्यांनी गाभण राहतील व सरासरी वर्ष दीड वर्षात मध्ये पहिलं वेद देते आणि वेत दिल्यानंतर त्या शेळीला दूध चालू होते परंतु या बीटेल जातीच्या शेळीला 11 महिने झाले तरी ती गाभण न जाता दूध देते हे एक आश्चर्यजनक प्रकार आहे.

यांना पूर्वीपासून शेतीची आवड असल्याने शेतीबरोबर पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी शेळीपालन सुरू केले म्हणजे बंदिस्त शेळीपालन नव्हे तर घरगुती चार ते पाच वेळा पाळल्या आहेत त्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं म्हणून अहिल्यानगर वरून तीन शेळ्या आणल्या होत्या त्यामध्ये बीटल जातीचे पिल्लू आणले होते सध्या ते पिल्लू 11 महिन्याचे झाले आहे परंतु गाभण न राहता ते पिल्लू आता दूध देत आहे हे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे आणि या बिटेल जातीच्या पिल्लाची सर्वत्र चर्चा सुरू आहे तर या ब्रिटन जातीच्या पिल्लाला बघण्यासाठी नागरिकांची गर्दी सुरू झाली आहे
प्रत्येक शेळी चा विचार केला तर 14 महिन्यांनी गाभण राहतील व सरासरी दोन वर्षात मध्ये पहिलं वेद देते आणि वेद दिल्यानंतर त्या शेळीला दूध चालू होते परंतु या बीटेल जातीच्या शेळीला 11 महिने झाले तरी ती गाभण न जाता दूध देते हे एक आश्चर्यजनक गोष्ट आहे


ही प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणा भागातील दुध आणि मांसासाठी अत्यंत फायदेशीर शेळीची जात आहे, जिला 'लाहोरी' नावानेही ओळखले जाते हे उत्तम दुध उत्पादक (दिवसाला २-४ लिटर) असून, वेगाने वाढणारी आणि चपळ जात आहे.या शेळ्यांचा रंग काळा किंवा तपकिरी असून, कान लांब, रुंद आणि खाली झुकलेले असतात


शारीरिक रचना:
लांब पाय, लांब व कुरळे कान, मागच्या बाजूला वळलेली शिंगे आणि लहान शेपटी ,तर पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे वजन ५०-६० किलो आणि शेळीचे वजन ३५-४० किलोपर्यंत असते तर रोज साधारण २ ते ३ लिटर (कधीकधी ४ लिटरपर्यंत) दुध देते.तसेच या शेळ्या एका वेळेस बहुतेकदा जुळी करडे देतात, त्यामुळे शेतकरी वर्गात लोकप्रिय आहेत.कमी वेळात चांगली वाढ, भारतीय हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता, आणि मांसासाठी
...... बिटल शेळीपालन का करावे ?
बिटल शेळीची मागणी महाराष्ट्रात वाढत आहे कारण त्यांच्या करडांची वाढ वेगाने होते. योग्य नियोजन केल्यास बिटल शेळीपालन हा एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो असे अनेक जाणकारांचे व प्रत्यक्ष शेळी पालन करणाऱ्यांचे मत आहे.





Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |