आकांक्षा खाडे तालुक्यात प्रथम

👤 संपादक - आण्णासाहेब मेटकरी | 📅 03 May 2026 | 👁 139 Views
आकांक्षा खाडे तालुक्यात प्रथम
वैभववाडी तालुक्याचा बारावीचा ९७.९७ टक्के निकाल
आकांक्षा खाडे तालुक्यात प्रथम



वैभववाडी ( प्रतिनिधी) फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (ता. २) दुपारी जाहीर झाला असून वैभववाडी तालुक्याचा एकूण निकाल ९७.९७ टक्के लागला आहे. आकांक्षा अजित खाडे हिने ९०.१७टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आहे निहारिका विठोजी पाटील (९०,०० टक्के) हिने द्वितीय तर संपदा प्रीतम जाधव (८९.३३ टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. तालुक्यातील प्रथम तीन क्रमांक कै हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पटाकावले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन
निकाल आज जाहीर झाला. याहीवर्षी निकालात मुलींनीच बाजी मारली. तालुक्यातील तीन कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण ३४६ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी प्रथमच परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने निकालाबाबत उत्सुकता वाढली होती. तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणेः
कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय, वैभववाडी या महाविद्यालयाचा तिन्ही शाखांचा निकाल १०० टक्के लागला आहे. कला शाखा: ४० पैकी ४० उत्तीर्ण प्रथमः निहारिका विठोजी पाटील (९०.००%), द्वितीयः संपदा प्रीतम जाधव (८९.३३%), तृतीयः रिया चंद्रकांत माळकर (७१.८३%) वाणिज्य शाखा ७९ पैकी ७९ उत्तीर्ण प्रथम आकांक्षा अजित खाडे (९०.१७%), द्वितीय पायल प्रदीप लिंगायत (८७.१७%), तृतीयः
तृष्णा संदीप घाडी (८५.१७%) विज्ञान शाखा : ८७ पैकी ८७उत्तीर्ण प्रथम : गौरी संजय चव्हाण (७९.८३%), द्वितीय: यश अशोक पाटील (७९.००%), तृतीय : प्रिती नितीन रावराणे (७७.००%) कनिष्ठ महाविद्यालय, आचिर्णे : वाणिज्य शाखा : ३१ पैकी २९ उत्तीर्ण (९३.५५%) प्रथम : समिक्षा रामदास शेलार (७६.५०%), द्वितीयः रोशनी रविंद्र शिंदे (७२.१७%), तृतीयः सिद्धी चंद्रकांत मांडवकर (६६.१७%) विज्ञान शाखाः ९५ पैकी ९४ उत्तीर्ण (९८.९४%) प्रथम : श्रेया संदीप शेळके (८३.००%), द्वितीय : सखाराम मोतीराम गुरखे (७५.८३%), तृतीय श्रुती संतोष कदम (६९.००%)
छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नेर्ले-तिरवडे एकूण १४ पैकी १३ विद्यार्थी उत्तीर्ण (९२.८३%). कला शाखा प्रथम सिद्धिका हरिश्चंद्र गुरव (६६.३३%), द्वितीय पूजा दशरथ सुतार (५६.८३%), तृतीय ऋतुजा संतोष आयरे (५३.८८%)
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |