भावानेच संपवले भावाचे कुटुंब; संपत्तीच्या वादातून तिहेरी हत्याकांडाने सोलापूर हादरले

👤 संपादक - आण्णासाहेब मेटकरी | 📅 03 May 2026 | 👁 199 Views
भावानेच संपवले भावाचे कुटुंब; संपत्तीच्या वादातून तिहेरी हत्याकांडाने सोलापूर हादरले
दैनिक आखुर | सोलापूर : जिल्ह्यात खळबळ उडवणारी धक्कादायक घटना समोर आली असून, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात तिहेरी हत्याकांड घडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सख्ख्या दिराने भावजयीसह तिच्या दोन मुलांची निर्घृण हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरामणी येथील मस्के कुटुंबीयांची घरे एकमेकांच्या शेजारी असून, मधल्या घरात गायत्री सुधाकर मस्के (वय ४२), त्यांची मुलगी प्रिया (वय १८) आणि मुलगा शिवराय (वय १६) राहत होते. मंगळवार मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी दिराने घराच्या गच्चीवरून प्रवेश करून झोपेत असलेल्या तिघांवर धारदार शस्त्राने सपासप वार केले.
या हल्ल्यात गायत्री आणि प्रिया यांचा मृतदेह गच्चीवरच आढळून आला, तर शिवरायचा मृतदेह घराच्या बैठकीच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला. ठसे तज्ञ, गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला असून पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

गायत्री मस्के या विधवा असून त्या आपल्या दोन मुलांसह राहत होत्या. शेजारीच सख्ख्या दिराचे घर असल्याने शेतजमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेमुळे बोरामणी गावासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |