ईश्वरपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : कर्णकर्कश सायलेन्सर जप्त करून केले नष्ट

👤 राहुल टिबे सांगली | 📅 12 May 2026 | 👁 225 Views
ईश्वरपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : कर्णकर्कश सायलेन्सर जप्त करून केले नष्ट
ईश्वरपूर शहरातील वाढत्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी इस्लामपूर पोलीस प्रशासनाने कर्णकर्कश आवाज करणाऱ्या व अवैध बदल केलेल्या मोटरसायकल सायलेन्सरविरोधात विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत ही मोहीम हाती घेण्यात आली.
या कारवाईदरम्यान मोठ्या आवाजाचे सायलेन्सर असलेल्या अनेक मोटरसायकलींवर कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेले अवैध सायलेन्सर पोलिसांनी नष्ट केले असून, या मोहिमेमुळे शहरातील ध्वनीप्रदूषण कमी करण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
सदर मोहीम उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अल्पेश लावंड, ग्रेड पीएसआय मोहिते तसेच पोलीस कर्मचारी यादव, शरद बावडेकर, सलमान मुलानी, सचिन मोरे, निलेश पुणे आणि रवींद्र बनसोडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना वाहनांमध्ये अवैध बदल न करण्याचे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा अशा प्रकारची कठोर कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |