महिला नेत्यांचा अवमान महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारा नाही; हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी – निशिकांत कडुलकर

👤 तुषार शिंगाडे | 📅 08 August 2026 | 👁 177 Views
महिला नेत्यांचा अवमान महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारा नाही; हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी – निशिकांत कडुलकर
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल करण्यात आलेल्या कथित अपमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्याचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत राजेंद्र कडुलकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. संबंधित वक्तव्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी कडुलकर यांनी केली आहे.
राजकारणात वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक आहे. मात्र, महिला लोकप्रतिनिधींबद्दल वक्तव्य करताना सभ्यतेची आणि सन्मानाची मर्यादा पाळली पाहिजे, असे कडुलकर यांनी म्हटले आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे महिला भगिनींच्या भावना दुखावल्या असून, महाराष्ट्राच्या संस्कृतीचाही अवमान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. महिलांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशाराही कडुलकर यांनी दिला.
“महाराष्ट्राला महिलांचा सन्मान करण्याची मोठी परंपरा आहे. राजकारणाचा स्तर खालावेल अशा प्रकारची वक्तव्ये करणे अत्यंत दुर्दैवी आहे. प्रत्येकाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि महिलांच्या सन्मानाचे भान ठेवले पाहिजे,” असे निशिकांत कडुलकर यांनी सांगितले.
दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असून, त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष निशिकांत राजेंद्र कडुलकर यांनी केली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |