केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करा - एसएफआय

👤 अतुल फसाले | 📅 07 June 2026 | 👁 177 Views
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करा - एसएफआय
NTA रद्द करा म्हणून एसएफआय आक्रमक
छत्रपती संभाजीनगर, दि. ६ जून — केंद्र सरकारच्या शिक्षण क्षेत्रातील अपयशी धोरणांविरोधात आणि राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेतील वाढत्या गोंधळाच्या निषेधार्थ स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या वतीने आज सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली.

यावेळी एसएफआयने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत "शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करा" अशी घोषणा दिली. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) बरखास्त करण्याची मागणीही करण्यात आली.

एसएफआयच्या चे अरुण मते म्हटले की, NTA च्या अकार्यक्षम कारभारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. NEET परीक्षेतील पेपरफुटी, UGC-NET अर्ज प्रक्रियेतील गैरव्यवस्थापन, CBSE परीक्षांच्या मूल्यमापनातील त्रुटी तसेच CUET-UG परीक्षा ऐनवेळी रद्द होण्याच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

या सर्व घटनांची जबाबदार म्हणून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची हकल्लपट्टी केली पाहिजे अशी मागणी एसएफआयने केली. तसेच देशभरात सुरू असलेल्या विशाल स्वाक्षरी मोहिमेचा आणि जनआंदोलनाचा भाग म्हणून ही निदर्शने आयोजित करण्यात आल्याचे एसएफआय जिल्हा सचिव मनिषा बल्लाळ यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या शिक्षणविरोधी धोरणांचा निषेध करत विविध घोषणाबाजी केली. शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ थांबवून विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही एसएफआयने दिला.

या प्रसंगी डॉ. लोकेश कांबळे, एसएफआय चे जिल्हा अध्यक्ष सुरज देवकर, आशितोष, शितल चोपडे, जीवन मोरे, संजीवनी ठोंबरे, प्रतिक बोरडे, नम्रता जवरे, प्रतिक्षा लांडगे, विश्वजित गिरी, पांडुरंग मगर, उतरा जाधव व विविध विभागांतील विद्यार्थी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |