ज्या लाभार्थ्यांचे कर्ज नाकारले जाते, त्यांना बँकेने लेखी स्वरूपात नेमके कारण कळविले पाहिजे - जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

👤 अतुल फसाले | 📅 22 May 2026 | 👁 225 Views
ज्या लाभार्थ्यांचे कर्ज नाकारले जाते, त्यांना बँकेने लेखी स्वरूपात नेमके कारण कळविले पाहिजे   - जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक संपन्न
सोलापूर — जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक तसेच सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत कर्जवितरणाची प्रगती, खातेउघडणीचे कामकाज आणि समितीने बँकांसमोर ठेवलेल्या उद्दिष्टांची अंमलबजावणी यांचा सखोल आढावा घेण्यात आला. तसेच ज्या लाभार्थ्यांचे कर्ज नाकारले जाते, त्यांना बँकेने लेखी स्वरूपात नेमके कारण कळविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सर्व बँकांनी नेमून दिलेले टारगेट शंभर टक्के पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे निर्देश देण्यात आले. उद्दिष्टपूर्ती वेळेत साध्य करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्यावर भर देण्यात आला. तसेच प्रत्येक बँकेने 75 टक्के खाते उघडणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, अशी सूचना करण्यात आली.
काही बँकांच्या कामकाजाबाबत असमाधान व्यक्त करून ठरवून दिलेले पीक कर्ज पूर्ण न करणे किंवा शासकीय योजना राबविण्यात झालेल्या दिरंगाईबाबत ॲक्सिस बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बंधन बँक आणि करूर वैश्य बँक यांना जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी नोटीस काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले.
बैठकीत नाबार्ड, ओबीसी महामंडळ, कृषी विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्र (DIC) यांचा आढावा घेण्यात आला. योजनांची प्रगती, निधी उपलब्धतेची स्थिती तसेच अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली. कर्ज मंजुरी किंवा नकार प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यावर भर देण्यात आला. ज्या लाभार्थ्यांचे कर्ज नाकारले जाते, त्यांना बँकेने लेखी स्वरूपात नेमके कारण कळविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले. तसेच सर्व बँकांनी जबाबदारीने कामकाज करून उद्दिष्टपूर्ती साध्य करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. प्रगतीचा पुढील आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे संकेतही देण्यात आले.
यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखार्डे, बँक अधिकारी श्री. कदम , जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र उमेशचंद्र दंडगव्हाळ, ओबीसी वित्त-विकास महामंडळ च्या जिल्हा व्यवस्थापक वृषाली लहारे यांच्या सह सर्व राष्ट्रीयकृत खाजगी व सहकारी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |