उरुण ईश्वरपूरमध्ये भाजपाची आढावा बैठक; SIR मोहिमेत सक्रिय राहण्याचे आमदार धैर्यशील कदम यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 12 July 2026 | 👁 398 Views
उरुण ईश्वरपूरमध्ये भाजपाची आढावा बैठक; SIR मोहिमेत सक्रिय राहण्याचे आमदार धैर्यशील कदम यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
उरुण ईश्वरपूर, सांगली:-येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उरुण ईश्वरपूर मतदार संघात परिवर्तन घडवून भाजपाचा आमदार निवडून आणण्यासाठी पदाधिकारी, बुथप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी SIR म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत सक्रियपणे काम करावे, असे आवाहन सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे नुतन आमदार मा. श्री. धैर्यशील कदम (दादा)यांनी केले.
उरुण ईश्वरपूर शहरातील मा. श्री. आण्णासाहेब डांगे इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यस्थळावर रविवारी उरुण ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक संपन्न झाली.
SIR आणि विकासावर भर
यावेळी बोलताना आमदार कदम म्हणाले, शासनाच्या वतीने मतदार याद्यांचे SIR मॅपिंगचे काम सुरू आहे. प्रत्येक मतदाराची नोंद मॅपिंगद्वारे झाली पाहिजे. बुथप्रमुखांनी BL0 शी संपर्क साधून मतदार नोंदणी सर्वोत्तम करून घ्यावी. शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात. सर्वांनी मिळून सर्वांगीण विकास करु. भाजपाची मुलतत्त्वे आत्मसात करून कामाला लागल्यास उरुण ईश्वरपूरमध्ये परिवर्तन होऊन भाजपाचा आमदार नक्की विजयी होईल."
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजयी झाल्याबद्दल आमदार धैर्यशील कदम यांचा माजी नगराध्यक्ष अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या बैठकीला माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजपाचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, विधानसभा प्रभारी राहुलदादा महाडिक, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत, जिल्हा उपाध्यक्ष स्वरुपराव पाटील यांच्यासह उरुण, आष्टा, वाळवा मंडल अध्यक्ष, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने बुथप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक विश्वनाथ डांगे यांनी केले, सूत्रसंचालन बजरंग कदम यांनी केले तर आभार विक्रमभाऊ पाटील यांनी मानले.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. |