स्वाभिमानी पॅथर प्रतिष्ठान,शिवसेना ( उठाबा ),भारतीय दलित महासंघ व शेकाप यांच्यावतीने सोनम वांगचुक यांच्या समर्थनात केंद्र सरकार व शिक्षणमंत्री यांचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलनाची साद घालण्यात आली होती. त्या अनुषंगाने शाहूवाडी तालुक्यातील समविचारी पक्षांनी एकत्र येत आज शाहूवाडी तहसीलवर एल्गार पुकारला.
यावेळी स्वाभिमानीचे प्रकाश कांबळे,शेकापचे नेते भाई भरत पाटील आप्पा,शिवसेनेचे दत्ता पोवार,भारतीय दलित महासंघाचे अनिरुद्ध कांबळे यांनी आपली मते व्यक्त करून केंद्र सरकारच्या धोरणावर वाभाडे ओढले.यावेळी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे समर्थन करणारे मंत्री हसन मुश्रीफ यांचा ही निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी विविध समविचारी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.