कणकवलीत पत्रकारांना वृत्तांकन करताना मज्जाव, विरोध करत पत्रकारांनी दाखवली एकजुट

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 22 July 2026 | 👁 344 Views
कणकवलीत पत्रकारांना वृत्तांकन करताना मज्जाव, विरोध करत पत्रकारांनी दाखवली एकजुट
रिक्षाचालक बाळा वराडकर, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांनी मागितली माफी ; यापुढे पत्रकारांना वृत्तांकन करताना अटकाव होणार नाही...
कणकवलीत महामार्ग उड्डाणपुलाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर नगरपंचायतच्यावतीने मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास पेट्रोलपंपासमोरील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी फळ व भाजी विक्रेत्यांसाठी तात्पुरती बसण्याची व्यवस्था करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी विक्रेत्यांसाठी जागेची मार्कीग करत असताना कणकवली येथील पत्रकार व्हिडीओ चित्रीकरण व फोटो काढत असताना ऑटो रिक्षाचालक मालक संघटना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळा वराडकर व माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांनी अटकाव केला. यावेळी श्री. वराडकर यांनी आक्षेपार्ह बोलत मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने तातडीची बैठक घेत पत्रकारांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या त्या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच संबंधितांना बोलावुन झालेल्या घटनेबाबत विचारणा केल्यानंतर रिक्षाचालक बाळा वराडकर, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांनी पत्रकारांची माफी मागितली आहे.
कणकवली शासकीय विश्रामगृह येथे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बुधवारी पार पडली. यावेळी पत्रकार परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, जिल्हा पत्रकार संघ उपाध्यक्ष संतोष राऊळ, पत्रकार हल्ला कृती समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत भावे, माजी अध्यक्ष चंद्रशेखर देसाई, अजित सावंत, सुधीर राणे, विरेंद्र चिंदरकर, सहसचिव दर्शन सावंत, खजिनदार रोशन तांबे,राजेश सरकारे, उमेश बुचडे, दिगंबर वालावलकर, तुषार हजारे, मयुर ठाकुर, राजन चव्हाण, भास्कर रासम, संजय बाणे, राजेंद्र दळवी, साहील बागवे, मिलिंद पारकर आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी शहरातील उड्डाणपुलाखाली कणकवली नगरपंचायतच्यावतीने रिक्षाचालक मालक संघटनेच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी अध्यक्ष बाळा वराडकर यांनी वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना तुम्ही व्हिडिओ करु नका, फोटो काढु नका, नाहीतर मोबाईल फोडुन टाकेन, कपडे काढुन मारहाण करेन अशी धमकी दिली होती. याबाबत पत्रकार संघाच्यावतीने रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अण्णा कोदे यांना झालेल्या घटनेबाबत अध्यक्ष भगवान लोके यांनी कल्पना दिली. संबंधित बाळा वराडकर यांच्यासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिका-यांना पत्रकारांच्या बैठकीत बोलावुन घेण्यात आले. झालेल्या चर्चेदरम्यान समाजात घडत असलेल्या घटनांचे वृत्तांकन करत असताना पत्रकारांना रोखणे चुकीचे आहे. पत्रकारांवर आरोप करताना विचार करा. तुम्ही पत्रकारांना दिलेली धमकी आणि व्हिडिओ व फोटो घेताना रोखल्याबद्दल माफी मागा, अशी मागणी पत्रकारांनी केली. त्यानुसार रिक्षाचालक बाळा वराडकर यांनी झालेल्या घटनेबाबत माझ्याकडुन भुलचुकीमुळे झाला. यापुढे कधीही माझ्याकडुन असे आक्षेपार्ह वर्तन होणार नाही, अशा शब्दात पत्रकारांची माफी मागितली.
तसेच या घटनेदरम्यान माजी नगरसेवक प्रसाद अंधारी व त्यांच्या सहका-यांनी पत्रकारांना चित्रिकरण करताना रोखले होते. याबाबत प्रसाद अंधारी यांना बैठकीत बोलावण्यात आले. वृत्तांकन करत असताना संबंधित पत्रकारांना अटकाव का केला? मोबाईल काढुन घेणार अशी धमकी देण्यात आली, याची विचारणा प्रसाद अंधारी यांना पत्रकार संघाच्या पदाधिका-यांकडुन करण्यात आली. त्यावेळी श्री. अंधारी यांनी संबंधित व्हिडिओग्राफर आहेत. हे मला माहीत नव्हते. त्यामुळे तसे वर्तन झाले.परंतु यापुढे अशी कुठलीही गोष्ट माझ्याकडुन होणार नाही. पत्रकारांची मने दुखवली असती तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगितले.
दरम्यान कणकवलीत पत्रकारांच्या अधिकारावर बंधन आणत वृत्तांकन करण्यास अटकाव केल्याबद्दल झालेल्या घटनेचा कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी पत्रकार एकजुटीचा विजय असो.... अशा घोषणा पत्रकारांनी दिल्या. तसेच कायमच एकसंघ राहण्याचा निर्धार केला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा |