भिमाई आश्रमशाळेत महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांची जयंती साजरी

👤 अतुल सोनकांबळे इंदापूर | 📅 22 July 2026 | 👁 367 Views
भिमाई आश्रमशाळेत महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांची जयंती  साजरी
येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार, तथागत गौतम बुद्धमूर्ती व इंदापूरचे माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे , संचालक गोरख तिकोटे यांनी अभिवादन केले.
यावेळी उपस्थितांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या सामाजिक, राजकीय व विकासाभिमुख कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या कार्याला उजाळा दिला.
यावेळी ॲड.समीर मखरे यांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या समता मखरे, उपप्राचार्या सविता गोफणे आदींसह अधिक्षक,शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.
कार्यक्रम शांत, साध्या व आदरपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा |