देवगड हायस्कूलमध्ये इंग्रजी कविता पाठांतर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 20 July 2026 | 👁 115 Views
देवगड हायस्कूलमध्ये इंग्रजी कविता पाठांतर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथील इंग्रजी विभाग व इंग्लिश क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमधील इंग्रजी भाषेची आवड, उच्चार कौशल्य, आत्मविश्वास व सादरीकरण क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने इंग्रजी कविता पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धा तीन गटांमध्ये पार पडली. गट क्रमांक १ (इयत्ता ५ वी ते ६ वी), गट क्रमांक २ (इयत्ता ७ वी ते ८ वी) आणि गट क्रमांक ३ (इयत्ता ९ वी ते १० वी) अशा तीन गटांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे परीक्षण शेठ म. ग. हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका सौ. अनुजा मुंबरकर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उच्चार, आवाजातील चढ-उतार, भावभावना, आत्मविश्वास व एकूण सादरीकरणाच्या आधारे स्पर्धकांचे मूल्यमापन केले. तसेच या स्पर्धेचे इंग्रजीतून सूत्रसंचालन इंग्लिश क्लबच्या विद्यार्थिनी कु. अनन्या कुंभरे व कु. श्रीमा प्रभूदेसाई यांनी केले.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री. प्रविण खडपकर, इंग्रजी विभाग प्रमुख श्री. संतोष चव्हाण, तसेच सहाय्यक शिक्षक श्री. सुरुंगले सर व सौ. आरती खोत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वास चालना मिळत असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी सादरीकरण करत स्पर्धेत रंगत आणली. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन इंग्रजी विभाग व इंग्लिश क्लबच्या माध्यमातून करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा | सर्व दिंडी सोहळे पंढरपूर नगरीमध्ये दाखल" |