लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेचे सहावे पर्व २३ जुलैला कोपरगावात

👤 गणेश डेंगळे अहिल्यानगर | 📅 20 July 2026 | 👁 182 Views
लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेचे सहावे पर्व २३ जुलैला कोपरगावात
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा अभिमान, प्रभावी वक्तृत्वकला, विचारशक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी पद्मभूषण श्री करमसीभाई सोमैया राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेचे सहावे पर्व गुरुवार, २३ जुलै २०२६ रोजी कोपरगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल, कोपरगाव यांच्या वतीने या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, राज्यभरातील इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे.शाळेचे प्राचार्य मा. श्री. के. एल. वाकचौरे यांनी सांगितले की, मराठी वक्तृत्व स्पर्धा ही केवळ स्पर्धा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच विचार मांडण्याची कला, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक भान विकसित करावे, या उद्देशाने लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे पाचवे पर्व अधिक भव्य, व्यापक आणि दर्जेदार स्वरूपात पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेतील पारितोषिके पुढीलप्रमाणे आहेत : प्रथम क्रमांकासाठी ₹५,००० रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी ₹३,००० रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकासाठी ₹२,००० रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच पुढील सात उत्कृष्ट वक्त्यांना प्रत्येकी ₹१,००० रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. स्पर्धेतील प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे आहेत :

गट अ :
१) लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
२) राष्ट्रभक्तीचा अखंड ज्वालामुखी – लोकमान्य टिळक
३) स्वरांची सरस्वती – लता मंगेशकर
४) थोर समाजसेवक – बाबा आमटे

गट ब :
१) महिलांना काय हवे – आरक्षण की संरक्षण?
२) सत्यम शिवम सुंदरम
३) अभंगाच्या स्वरात गुंजणारा महाराष्ट्र
४) गडकिल्ले : इतिहासाचे साक्षीदार

राज्यातील सर्व शाळांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. बी. के. तुरकणे(9922301668), सौ. रोहिणी होन, श्री. मच्छिंद्र नन्नवरे तसेच श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल, कोपरगाव यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |