सोलापूर विद्यापीठाच्या 'उद्यम फाउंडेशन'ची जागतिक झेप; स्टार्टअप आणि उद्योजकतेला नवे पंख!

👤 आशुतोष फसाले | 📅 19 July 2026 | 👁 151 Views
सोलापूर विद्यापीठाच्या 'उद्यम  फाउंडेशन'ची जागतिक झेप; स्टार्टअप आणि उद्योजकतेला नवे पंख!
आपल्या स्टार्टअपसाठी यांना संपर्क करा प्रा डॉ गणेश काकांडीकर - संचालक : नवोपक्रम, नव संशोधन आणि साहचर्य मंडळ डॉ. राजेश गुरानी- मुख्य कार्यकारी अधिकारी उद्यम इनक्यूबेशन सेंटर +91 70802 02055


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे अधिकृत इन्क्युबेशन सेंटर असलेल्या उद्यम फाउंडेशन' ने (कलम ८ अंतर्गत स्थापित कंपनी) अल्पावधीतच स्टार्टअप आणि उद्योजकीय क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्था मान्यताप्राप्त या केंद्राने केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर थेट दुबईपर्यंत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
७२+ स्टार्टअप्सना बळ आणि कोट्यवधींची गुंतवणूक
फाउंडेशनने आतापर्यंत देशभरातील ७२ हून अधिक स्टार्टअप्सना इन्क्युबेशन सहाय्य दिले आहे. यात ॲग्रीटेक, हेल्थकेअर, डीपटेक, एआय आणि सस्टेनेबिलिटी अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, 'सोलापूर शार्क टँक - सीझन २'*अंतर्गत देशभरातून १५० हून अधिक उद्योजकांनी सहभाग नोंदवला, ज्यामधून निवडक ७ स्टार्टअप्सना थेट*₹४ कोटींपर्यंतच्या गुंतवणुकीची वचनबद्धता प्राप्त झाली आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कौशल्य विकास
उद्यमशाळा व FDP
जिल्ह्यातील तब्बल २,५०० शिक्षक व १३० हून अधिक प्राध्यापकांना उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप संस्कृती रुजवली जात आहे.
उद्यम प्रेरणा केंद्र व उद्यम दीप
संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रेरणा केंद्र सुरू करून आणि 'उद्यम दीप' एक्स्पोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थेट उद्योजकांशी संवाद साधण्याची संधी दिली जात आहे.
सर्वसमावेशक विकास वंचित घटकांसाठी 'SC/ST/OBC गुंतवणूक सहाय्य' कार्यक्रमांतर्गत २८१ अर्जांमधून नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सची निवड करण्यात आली आहे, तर 'सारथी' आणि 'एचडीएफसी परिवर्तन' द्वारे अनेक स्टार्टअप्सना आर्थिक पाठबळ मिळाले आहे.
सोलापूरच्या टेक्सटाईलला जागतिक बाजारपेठ
फाउंडेशनने आयोजित केलेल्या दुबई बिझनेस डेलिगेशन'मुळे सोलापूरच्या प्रसिद्ध टेक्सटाईल उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाली आहे. स्थानिक उद्योजकांना दुबईतील निर्यात संधी, जागतिक नेटवर्किंग आणि व्यावसायिक भागीदारीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला असून, सोलापूरचे नाव जागतिक स्तरावर पोहोचले आहे.
कल्पनेपासून ते थेट उद्योग उभारणी, पेटंट , गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय बाजारापर्यंत सर्व सेवा एकाच छताखाली देणारे 'उद्यम फाउंडेशन' आज खऱ्या अर्थाने नवीन भारताच्या आत्मनिर्भरतेचे केंद्र बनले आहे.

"सोलापूरमध्ये स्टार्टअप्स आणि उद्योजकतेची संस्कृती रुजवण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत. उद्यम इनक्यूबेशन फाउंडेशन च्या माध्यमातून नवोदित संशोधकांना आणि तरुणांना आवश्यक ते बळ दिले जात आहे. यासोबतच, सोलापूरच्या समृद्ध स्थानिक वस्त्रोद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणे हे ही आमचे ध्येय आहे.
प्रा. डॉ. प्रकाश महानवर
कुलगुरु, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठ
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा |