मिलिंद सदानंद पवार शाळेत रंगभरण स्पर्धा संपन्न

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 16 July 2026 | 👁 138 Views
मिलिंद सदानंद पवार शाळेत रंगभरण स्पर्धा संपन्न
यावेळी सर्व मान्यवरांचे सहभागी शाळांच्या शिक्षकांचे, उपस्थित पालक वर्गांचे व सहभागी विदयार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना श्री. राजेंद्र हिंदळेकर यांच्यामार्फत खाऊचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक शाळा, देवगड
देवगड एज्यूकेशन बोर्ड संचालित,मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक शाळेच्या चित्रकार प्रथमेश राजेंद्र हिंदळेकर (बालविभाग) यांच्या जन्मदिनानिमित देवगड जामसंडे नगरपंचायत मर्यादित इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक 11 जुलै 2026 रोजी करण्यात आले.
या रंगभरण स्पर्धेमध्ये देवगड - जामसंडे नगरपंचायत मधील एकूण सहा शाळांनी सहभाग घेतला. यामध्ये इयत्ता पहिली गट क्रमांक एक-51,
इयत्ता दुसरी गट क्रमांक दोन - 80 , इयत्ता तिसरी गट क्रमांक तीन - 83,इयत्ता चौथी गट क्रमांक चार - 82 अशा एकूण - 296 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या रंगभरण स्पर्धेचे उद्घाटन मा.श्री राजेंद्र हिंदळेकर (देणगीदार माजी पर्यवेक्षक मिठबाव हायस्कूल) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मा.श्री सदानंदजी पवार(उपाध्यक्ष देवगड एज्युकेशन बोर्ड मुंबई), मा.श्री शिंगाडे सर( शाला समिती अध्यक्ष व स्थानय समिती सदस्य )मा.श्री राऊत सर, (शेठ.मग.हायस्कूल माजी मुख्याध्यापक),स्थानीय समिती सदस्या सौ.अनुश्री पारकर, स्थानीय समिती सदस्य मा.श्री. रूमडे सर, स्थानीय समिती सदस्य मा. श्री. मिलिंद कुबल सर प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री प्रविण खडपकर तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक व1 पालक वर्ग उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा |