नव्या मार्केट यार्डच्या कामाची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी; घेतला कामाचा आढावा

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 16 July 2026 | 👁 160 Views
नव्या मार्केट यार्डच्या कामाची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी; घेतला कामाचा आढावा
सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या आधुनिक मार्केट यार्डला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

यावेळी बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. मार्केट यार्डच्या उर्वरित बांधकामाची सद्यस्थिती, आवश्यक निधी आणि पुढील कामाचे नियोजन याबाबत पालकमंत्र्यांनी सभापती व अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

मार्केट यार्डचे उर्वरित बांधकाम निर्धारित कालावधीत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. तसेच शेतकरी, व्यापारी आणि कृषी पणनाशी संबंधित सर्व घटकांच्या हितासाठी हे आधुनिक मार्केट यार्ड लवकरात लवकर कार्यान्वित होणे गरजेचे असल्याचे सांगत, सर्वांनी समन्वयाने काम करून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आवाहनही पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा |