मुंबईत रंगला 'आर्यारवी एंटरटेनमेंट'चा भव्य पुरस्कार सोहळा; आटपाडीसह राज्यभरातील साहित्यिक, पत्रकार व समाजसेवकांचा गौरव!

👤 आटपाडी प्रतिनिधी | 📅 15 July 2026 | 👁 26 Views
मुंबईत रंगला 'आर्यारवी एंटरटेनमेंट'चा भव्य पुरस्कार सोहळा; आटपाडीसह राज्यभरातील साहित्यिक, पत्रकार व समाजसेवकांचा गौरव!


'आर्यारवी एंटरटेनमेंट' आयोजित पहिल्या 'पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य व समाजसेवक पुरस्कार सोहळा २०२६' चा भव्य दिव्य वितरण सोहळा दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर हॉलमध्ये अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यात आटपाडीसह पुणे, कराड, कल्याण आणि राज्यभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते मानाचे पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
दीपप्रज्वलनाने या दिमाखदार सोहळ्याची सुरुवात झाली, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आर्यारवी एंटरटेनमेंटचे आयोजक, प्रसिद्ध लेखक, अभिनेता, दिग्दर्शक आणि पत्रकार तेटांबे यांनी या सोहळ्याचे नेटके नियोजन केले होते.
मान्यवरांची मांदियाळी आणि कौतुकाची थाप
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जगप्रसिद्ध बोलके बाहुलाकार आणि जादूगार सन्मा. श्री. श्रीधर कीर, "कुटुंब रंगलंय काव्यात" फेम सादरकर्ते प्रा. विसुभाऊ बापट, प्रसिद्ध कवी व साहित्यिक अरुण म्हात्रे, 'दर्याचा राजा'चे संपादक साहित्याचार्य पंढरीनाथ तामोरे, ज्येष्ठ पत्रकार व जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ मधुसूदन तिरपणकर, शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अँड. सुनिल भार्गवराम शिर्के उपस्थित होते.
तसेच समाजसेवक व सी आय बी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष वैभव सुरेश कदम, शुश्रूषा हॉस्पिटलचे माजी कोषाध्यक्ष/संचालक कृष्णा बाळू काजरोळकर, प्रसिद्ध अभिनेते व समाजसेवक अँड. गौरव जयवंत पाटील आणि स्पेस रिअलटर्सचे अतुल तोडकरी आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित सर्वच मान्यवरांनी पुरस्कारार्थींच्या कार्याचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विविध पुरस्कारांनी दिग्गजांचा बहुमान
या सोहळ्यात 'स्वाभिमान लेखणी', 'शब्दवेध गौरव', 'अजेय लेखणी', 'कलम-रत्न', 'साहित्य-संस्कृती जीवनगौरव', 'विवेक-दीप', 'कलागौरव', 'जनसेवा रक्षक' आणि 'निर्भीड पत्रकारिता' या प्रतिष्ठित पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
पुरस्कार सोहळ्यात 'या' मानवंतांची बाजी
या पहिल्याच पुरस्कार सोहळ्यात आटपाडीच्या पत्रकार व लेखकांनी विशेष बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक व इतिहास संशोधक विलास खरात, सचिन वाघमारे, सुधीर पाटील, दादासो वाक्षे, सदाशिव पुकळे, राजू शेख, कराडच्या अनुश्री खांडेकर, पुण्याच्या योगिता कोठेकर, कल्याणच्या सुनीता खेरणार, डॉ. सोनाली मेश्राम, डॉ. दीपक खरात, जावेद शेख, फिरोज शेख, रघुनाथराव ढोक, विजय टाकणे, पत्रकार राहुल खरात, योगिता जाधव आणि मनीषा कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
उपस्थित रसिकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात आणि अत्यंत चैतन्यमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या विविध क्षेत्रांतील गुणवंतांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा अक्षशः स्मरणीय ठरला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. |