मतदार पुनरिक्षण मोहीम अंतर्गत अंबड येथे बीएलओ मतदाराचा दारात

👤 अनिल भालेकर | 📅 12 July 2026 | 👁 790 Views
मतदार पुनरिक्षण मोहीम अंतर्गत अंबड येथे बीएलओ मतदाराचा दारात
नागरिकांचा राष्ट्रीय कर्तव्याचा हक्क अबाधित राहण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील बिडे यांची निस्वार्थ सेवा
भारतीय निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या पारदर्शकतेसाठी विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत अंबड तहसील निवडणूक विभागाच्या वतीने बीएलओ म्हणून अनिल रोहिदास चव्हाण हे कर्तव्य बजावत आहे.
आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न करता अनिल चव्हाण हे मतदारांच्या घरापर्यंत जात,मतदारांना एसआयआर अर्ज वाटप करत आहे.त्याचबरोबर मतदार राजाला या बाबत योग्य ते व अचूक मार्गदर्शन, सहकार्य करत जनजागृती करत आहे.

विशेष लक्ष विधी व कौतुकास्पद बाब म्हणजे, आपले आद्य कर्तव्य समजून निस्वार्थ भावनेने या राष्ट्रीय कार्यात चांगले नगर स्थित सामाजिक कार्यकर्ते सुनील बिडे हे स्वतः बीएलओ सोबत या राष्ट्रीय कार्यात अत्यंत मोलाचे व महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. बीएलओ सोबत मतदारांच्या घरी जात अर्ज वाटप करण्यापासून ते अचूकपणे अर्ज भरून घेत नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य करत आहे. त्याचबरोबर मतदार पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत मतदारांना या मोहिमेत उस्फूर्तपणे सहकार्य करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. सर्वसामान्य नागरिक आपल्या राष्ट्रीय हक्कापासून वंचित राहू नये या प्रांजल उद्देशाने सुनील बिडे हे निस्वार्थ कार्य करत आहे. रहिवाशांना देखील त्यांच्या या सहकार्याचा व मार्गदर्शनाचा मोठा फायदा होत आहे. त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल नागरिकांचे वतीने त्यांचे विशेष अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल |