महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या पंढरपुरात आल्या असता श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांचा सन्मान विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य संभाजी राजे शिंदे, सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, यांनी मंदिर समितीच्या वतीने शाल, श्रीफळ ,पुष्पहार देऊन सन्मान केला. यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकीयन , जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत ढगळे मुख्याधिकारी महेश रोकडे व्यवस्थापक प्रवीण कुमार गम तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखडा अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी संपूर्ण माहिती दिली.