राष्ट्रभाषा हिंदी परीक्षेत घवघवीत यश
महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे, अंतर्गत हिंदी बालबोधिनी, प्राथमिक, प्रवेशिका तसेच सुबोध या शासकीय परीक्षा माहे फेब्रुवारी २०२६ मध्ये शेठ म. ग. हायस्कूल केंद्रावर घेण्यात आल्या होत्या, या परीक्षेत देवगड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सदर परीक्षेमध्ये एकूण ८९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी १४ विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी ४५, द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी २१ आणि तृतीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी ०६ आहेत. परीक्षेमध्ये यशस्वी झालेले सर्व विद्यार्थी, शिक्षक यांचे प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री प्रवीण खडपकर, पर्यवेक्षिका सौ. दहीबावकर मॅडम तसेच संस्थाचालकांनी अभिनंदन व कौतूक केले.
सदर परीक्षेला प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील हिंदी विषय विभाग प्रमुख श्री एस. पी. जंगले, हिंदी विषय शिक्षक श्री आर. ए. बांदिवडेकर, श्री ए. एस. धुर्वे यांनी मार्गदर्शन केले.